Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedखाजगीकरणाच्या युगात सहकार जपणाऱ्या संस्था दुर्मिळ* सहकार आयुक्त दीपक तावरे ;...

खाजगीकरणाच्या युगात सहकार जपणाऱ्या संस्था दुर्मिळ* सहकार आयुक्त दीपक तावरे ; ग्राहक पेठ तर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व विशेष सन्मान सोहळा

 

 

पुणे : सध्या सर्वत्र खाजगीकरणाचे युग झाले आहे. त्यामध्ये रा.स्व. संघाच्या संस्कारात तयार झालेली ग्राहक पेठेसारखी संस्था सहकार जपत उत्तम कार्य करीत आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करताना अनेकदा ग्राहक पेठेचे उदाहरण दिले जाते. त्यामुळे खाजगीकरणाच्या युगात सहकार जपणाऱ्या अशा संस्था दुर्मिळ होत असल्याचे मत सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी व्यक्त केले.

 

ग्राहक पेठ तर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहकार आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे विशेष सन्मान करण्यात आले. यावेळी जयराज आणि कंपनीचे राजेश शहा, ग्राहक पेठेच्या अध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सारस्वत बँक, कॉसमॉस बँक, विश्वेश्वर बँक, पुणे पीपल बँक, संपदा बँक, देवगिरी बँक यांचा तसेच कोहिनूर फुड्स, चितळे बंधू बेके लाईट यांचा त्यांच्या सहकार्याबद्दल सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित, मंजुश्री खेडकर, बाबुराव चांदेरे, राघवेंद्र उर्फ बापू मानकर, धीरज घाटे, अमर आवळे या ग्राहक पेठेचे ग्राहक असलेल्या व नुकत्याच निवडून आलेल्या नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.

 

सूर्यकांत पाठक म्हणाले, ग्राहक पेठ ही १९७७ साली सुरु झाली. आता ४९ वर्षे पूर्ण होत असून सुवर्णमहोत्सवी वर्षात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदा तांदूळ महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दरवर्षीप्रमाणे महोत्सवाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. ‘ट्रेंड सेटर’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मिलिंद ओक यांचे असून अभिलाषा चेल्लम, जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, मालविका दीक्षित यांनी गायन केले आहे. तर, कुणाल फडके, ऋतुजा इंगळे, अभिषेक हवारगी, रिया देसाई यांनी नृत्य सादरीकरण केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments