पुणे, दि. १७ (जिमाका वृत्तसेवा)
हिंद-दि-चादर उपक्रमांतर्गत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर, श्रेयश गार्डन, मोहन नगर, धनकवडी, पुणे येथे संपन्न झाले.
या शिबिरात एकूण ८१ रुग्णांचे नाव नोंदवले गेले, ज्यात ७८ जणांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या शिबिरात सहभागी पुरुषांची संख्या २१ तर स्त्रियांची संख्या ४१ होती. हिमोग्लोबिन तपासणीत सर्व सहभागी रुग्ण अॅनिमियामुक्त असल्याचे निदर्शनास आले.
या शिबिरामुळे नागरिकांना रक्तातील हिमोग्लोबिन स्तराची स्थिती जाणून घेण्याची सुवर्णसंधी मिळाली, तसेच आरोग्य संवर्धनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना पुढील उपचार घेण्याबाबत अवगत करण्यात आले आहे, असे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.


