पुणे, 18 फेब्रुवारी 2026 — एक अग्रगण्य उत्पादन आणि अभियांत्रिकी कंपनी भारत फोर्ज आणि उत्पादन अभियांत्रिकी आणि उत्पादन सेवा क्षेत्रातील जागतिक पुरवठादार कंपनी व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीज यांनी प्रमुख तंत्रज्ञान-प्रणीत क्षेत्रांमध्ये धोरणात्मक सहयोगाचा मागोवा घेण्यासाठी आपल्या व्यापक समजुतीच्या आधारावर सामंजस्य करार (MoU) केला आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत, दोन्ही पक्ष ऑटोमोटिव्ह, संरक्षण, एआय आणि डेटा सेंटर क्षेत्रांमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये संयुक्तपणे संधींचा पाठपुरावा करण्याचा मानस बाळगतात. अभियांत्रिकी, उत्पादन आणि तंत्रज्ञान नाविन्यपूर्णता यातील त्यांच्या परस्परपूरक सामर्थ्यांचा उपयोग करून ऑटोमोटिव्ह, संरक्षण आणि एआय सर्व्हर प्लॅटफॉर्मसाठी अत्याधुनिक उत्पादने संयुक्तपणे विकसित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्यात आली आहे. जनरेटिव्ह इंटेलिजन्स, स्वायत्त प्रणाली आणि शाश्वत संगणनातील प्रगतीमुळे उद्योगांचे स्वरूप नवीन आकार घेत असताना वेगाने विकसित होणाऱ्या एआय जगाशी सुसंगत राहून हे सहकार्य दोन्ही कंपन्यांना जागतिक एआय परिसंस्थेमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी आणि भविष्यकालीन उपाय सुविधांसाठी त्यांच्या परिवर्तनक्षम क्षमतेचा उपयोग करण्यास सक्षम बनवते.
इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन, सॉफ्टवेअर, सिस्टीम इंटिग्रेशन आणि उत्पादन क्षेत्रातील व्हीव्हीडीएनच्या सामर्थ्यांना प्रगत उत्पादन आणि अचूक अभियांत्रिकीतील भारत फोर्जच्या कौशल्याची जोड देऊन दोन्ही कंपन्या विकसित होत असलेल्या उद्योग आवश्यकतांशी आणि उभरत्या तंत्रज्ञानांशी सुसंगत अशा विस्तारक्षम व उच्च-प्रभावी उपायांच्या विकासाचा शोध घेण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत.
भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित कल्याणी म्हणाले: “ही भागीदारी आम्हाला प्रगत तंत्रज्ञानांचा लाभ घेण्यास, नाविन्यपूर्णतेला चालना देण्यास आणि आमच्या ग्राहक व भागधारकांना पुरविल्या जाणाऱ्या उपायसुविधांच्या गुणवत्तेत वाढ करण्यास सक्षम करते. उत्कृष्टतेच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या भागीदारांशी सहकार्य करून आम्ही ज्ञान देवाणघेवाण, कार्यक्षम कार्यपद्धती आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मितीला प्रोत्साहन देणारी मजबूत परिसंस्था निर्माण करतो. अशा प्रकारचे सहयोग आमच्या धोरणाचे अविभाज्य भाग असून त्यायोगे आम्ही कार्यक्षम, स्पर्धात्मक, भविष्यसाठी तयार राहतो आणि आम्ही सेवा देत असलेल्या बाजारपेठांच्या बदलणाऱ्या गरजांना प्रतिसाद देण्यास सक्षम राहतो.”
व्हीव्हीडीएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुनीत अगरवाल म्हणाले: “भारत फोर्जसोबतची ही भागीदारी प्रगत अभियांत्रिकी आणि डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे नाविन्यपूर्णतेला चालना देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. आमच्या उत्पादन अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील सामर्थ्यांना भारत फोर्जच्या क्षेत्रीय नेतृत्वासोबत एकत्रित करून आम्ही ऑटोमोटिव्ह, संरक्षण आणि डेटा सेंटर परिसंस्थांसह इतर आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक उपायांच्या विकासाला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत.”
विकास चक्रांना गती देऊन आणि जगभरातील ग्राहकांसाठी उन्नत मूल्यनिर्मिती साध्य करत ही धोरणात्मक भागीदारी भारत फोर्ज आणि व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीज यांच्या नाविन्यपूर्णता, गुणवत्ता आणि दीर्घकालीन सहकार्यावरील सामायिक बांधिलकीला अधोरेखि
त करते.


