Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorized*राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन..*

*राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन..*

 

आज गुरूवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे “शिवजयंती” निमित्त शहराध्यक्ष श्री. योगेश मंगलसेन बहल यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते “श्री. छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

शहराध्यक्ष योगेश बहल आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, कितीही संकटे आले तर डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत. शिवराय हे केवळ राजे नव्हते, तर ते एक प्रजेचे कैवारी होते. अन्याय, अत्याचार करणाऱ्यांचा त्यांनी चोख बंदोबस्त केला. परकीय आक्रमकांना देशातून हाकलून लावण्यासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव असून छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट आणि ॲड गोरक्ष लोखंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी, शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, प्रदेश सरचिटणीस ॲड. गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, कार्याध्यक्ष विजय लोखंडे, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, प्रदेश कार्याध्यक्ष ओबीसी ॲड.सचिन औटे, मा.नगरसेवक प्रकाश सोमवंशी, नगरसेवक जितेंद्र ननावरे, वर्षा जगताप, मनिषा लांडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, कामगार अध्यक्ष युवराज पवार, उपाध्यक्ष अमोल भोईटे, संपतराव पाचुंदकर, अभिजीत आल्हाट, दत्तात्रय जगताप, भाग्यश्री म्हस्के, रिना तोरणे, अरूण पवार, ॲड निशा कांबळे, अर्बन सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कुमार कांबळे, ॲड वसंत कांबळे, सरविंदर सिंग बाला, पवन खराडे, संजय साळवे, बापू सोनवणे, विक्रम पवार, गणेश गायकवाड, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यादी पदाधिकारीसह आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments