Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती मिरवणूक तब्बल १००० पेक्षा अधिक...

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती मिरवणूक तब्बल १००० पेक्षा अधिक विद्यार्थी पारंपरिक वेशात मिरवणुकीत सहभागी

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार पेठेतील सोसायटीच्या प्रांगणातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी तब्बल १००० पेक्षा अधिक विद्यार्थी पारंपरिक वेशात रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

 

यावेळी इतिहास तज्ञ डॉ.प्रमोद बोऱ्हाडे, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, कारभारी मंडळ अध्यक्ष- कमल व्यवहारे व नियामक मंडळाचे सदस्य रघुननंदन जाधव, सचिन शिंदे, प्रदीप उरसळ, अमर शिंदे, तसेच तानाजी घारे, पद्माकर पवार आदी उपस्थित होते.

 

डॉ. तुळशीराम हरि दाते, ज्ञानराज रामचंद्र व्यवहारे, संभाजी रामचंद्र भोसले, दत्तात्रय मारुती मुळे, दत्तात्रय काशिनाथ कोलते, विजयकुमार शांतिनाथ बोर्डे, ॲड. मोहनराव बाबुराव देशमुख, संभाजी कोंडीबा कापसे, दत्तात्रय मारुतीराव मुळे, श्रीकृष्णाजी विष्णूजी संकपाळ, हरिश्चंद्र कृष्णाजी शेंडकर, नामदेव कृष्णाजी शिळमकर, वसंत रघुनाथराव शिंदे, कृष्णराव तात्याबा सोनवणे, गंगाधर घारे, वासंती बोर्डे, या सर्व संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान करण्यात आला.

 

सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू झाली. बाजीराव रस्तामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा सोसायटीमध्ये मिरवणुकीचा समारोप झाला. छत्रपती शिवरायांचा आकर्षक रथ मिरवणुकीत सहभागी होता. यासोबत नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल-ताशा वादन आणि गंधर्व बँडचे वादन मिरवणुकीत झाले. सोसायटीच्या सर्व शाखांतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

 

डॉ. प्रमोद बोऱ्हाडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेवले तर आजची पिढी निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान आणि निर्माणक्षम होईल. परकीय लोकांचे आदर्श परराष्ट्राचे आदर्श ठेवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानावे.

 

अण्णा थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची, स्वराज्याच्या प्रेरणेची आणि राष्ट्राभिमानाच्या तेजस्वी विचारांची ज्योत आजच्या पिढीत प्रज्वलित व्हावी, या उद्देशाने शिवजयंती उत्सव व मिरवणूक आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शिवरायांचे शौर्य, संस्कार आणि आदर्श समाजात रुजणे ही आजची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments