Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध विषय समिती सदस्यांची निवड...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध विषय समिती सदस्यांची निवड नवनियुक्त सदस्यांना महापौर रवि लांडगे यांनी दिल्या शुभेच्छा

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीवर सदस्यांची निवड करण्यात आली. या सर्व सदस्यांना महापौर रवि लांडगे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

 

महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. यामध्ये स्थायी समितीसह एकूण ५ विषय समित्यांच्या सदस्यपदावर निवड करण्याचा विषय सभापटलावर होता. पक्षीय बलाबलानुसार या समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गटनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेना पक्षाच्या वतीने गटनेते विश्वजित बारणे यांनी विषय समितीनिहाय बंद लिफाफ्यात पिठासीन अधिकारी रवि लांडगे यांच्याकडे नावे सादर केली. यानंतर समितीनिहाय सदस्यांची नावे जाहीर करण्यात येऊन त्यांची निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी रवि लांडगे यांनी घोषित केले. महानगरपालिकेच्या विविध विकासात्मक, सामाजिक व प्रशासकीय कामकाजासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका बजावणार असून, नव्याने निवड झालेल्या सदस्यांकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य होईल, असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

 

पक्षनिहाय समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे –

 

 

 

स्थायी समिती

 

अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन (भारतीय जनता पार्टी)

 

 

 

सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

 

 

 

सुलभा उबाळे (शिवसेना)

 

 

 

———-

 

 

 

विधी समिती

 

ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम (भारतीय जनता पार्टी)

 

 

 

शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

 

 

 

———–

 

 

 

शहर सुधारणा समिती

 

अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय (नाना) काटे, सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे (भारतीय जनता पार्टी)

 

 

 

डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

 

 

 

———

 

 

 

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

 

 

 

कैलास कुटे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे (भारतीय जनता पार्टी)

 

 

 

भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

 

 

 

——–

 

 

 

शिक्षण समिती

 

पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रविना आंगोळकर, कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोऱ्हाडे (भारतीय जनता पार्टी)

 

 

 

प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

 

 

 

———-

 

 

 

महिला व बालकल्याण समिती

 

 

 

पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे (भारतीय जनता पार्टी)

 

 

 

निकिता कदम, सारिका मासूळकर, मनिषा लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

 

 

 

निवड झालेल्या सर्व समिती सदस्यांचा पिठासीन अधिकारी तथा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना ग

टनेते विश्वजीत बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसदस्य व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments