Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी...

हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त विशेष टपाल प्रेझेंटेशन पॅकचे पुण्यात प्रकाशन*

 

 

पुणे, दि. २१ फेब्रुवारी २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त भारतीय टपाल विभागामार्फत विशेष प्रेझेंटेशन पॅक जारी करण्यात आला असून त्याचे औपचारिक प्रकाशन शुक्रवारी पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले.

 

या प्रेझेंटेशन पॅकचे अनावरण पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते तसेच उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शीख गुरुद्वारा असोसिएशनचे अध्यक्ष सरदार संतसिंगजी मोखा, गुरुद्वारा गुरु नानक दरबारचे अध्यक्ष सरदार चरणजितसिंग साहनी, सिंह सभा देहूरोडचे अध्यक्ष सरदार गुरमीतसिंग रट्टू, गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभाचे अध्यक्ष सरदार भोला सिंग अरोरा, रमिन्दर सिंघ राजपाल, डॉ. रणजीत सिंघ अरोरा, एन. पी. सिंग बक्षी, एस. एस. लबाना, बलजीत सिंग, शक्ती सिंग कल्याणी तसेच विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी, पुणे महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी शीख, लबाना, सिकलीगर , बंजारा, सिंधी, वाल्मिकी समाज तसेच इतर अल्पसंख्याक समाजांच्या पदाधिकाऱ्यांना मा. महापौर व उपमहापौर यांनी येऊ घातलेल्या “हिंद दी चादर-श्री गुरु तेग बहादूर जी ३५० वे शहीदी समागम” या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी निमंत्रित केले.

 

सदर शहीदी समागम २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून राज्यभरातील तसेच इतर भागांतील भाविक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 

धर्मस्वातंत्र्य व मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ “हिंद दी चादर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर जी यांना ही अभिवादनात्मक श्रद्धांजली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments