पुणे, दि.२२: श्री गुरु तेग बहादूर साहिबजीच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्यावतीने गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा, गणेश पेठ येथे विशेष आरोग्य शिबिराचे शनिवारी आयोजित करण्यात आले, या शिबिरामध्ये संगत व स्थानिक नागरिकांनी सहभागी होऊन विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये गर्भवती महिलांचे आरोग्य ,हिमोग्लोबिन, नॉन-कंटेजियस आजार तपासणी, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची माहिती, आभा ओळखपत्र नोंदणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या डॉक्टर व कर्मचारी यांनी सेवाभावाने सर्वांची तपासणी व मार्गदर्शन केले. यावेळी गणेश पेठ येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभेचे अध्यक्ष भोला सिंग अरोरा, सचिव रमिंदर सींग राजपाल यांच्यावतीने सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या आरोग्य शिबिराचा अनेक भाविक व नागरिकांनी लाभ घेतला असून गुरुद्वारा प्रबंधक समितीने सर्वांचे आभार मानले.


