Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे सिटी अर्धमॅरेथॉन स्पर्धा 1मार्च रोजी रंगणार पुना क्लब तर्फे सलग...

पुणे सिटी अर्धमॅरेथॉन स्पर्धा 1मार्च रोजी रंगणार पुना क्लब तर्फे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन

पुणे, 26 फेब्रुवारी: पहिल्या दोन अर्धमॅरेथॉन स्पर्धेच्या दैदिप्यमान यशानंतर द पूना क्लब लिमिडेट’ यांच्या तर्फे येत्या 1 मार्च 2026 रोजी सलग तिसऱ्या वर्षी पुणे सिटी अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टच्या यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेला सदर्न कमांड पुणे, पुणे इन्कम टॅक्स, पुणे पोलिस दल, पुण्याचा जीएसटी विभाग आणि पुणे महानगरपालिका यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे.

 

यंदाच्या पुणे सिटी अर्धमॅरेथॉन स्पर्धेत 15000हून अधिक धावपटूंचा सहभाग असून हे धावापटू 21.1किमी, 10किमी, 5किमी आणि 3 किमी या चार गटात स्पर्धा करणार आहे.

 

रेस डायरेक्टर शैलेश रांका म्हणाले की, पुणे सिटी अर्धमॅरेथॉन ही केवळ एक स्पर्धा नसून आरोग्यपूर्ण पर्यावरण पूरक आणि परस्पर सहकार्य या निकषांवर संपूर्ण समाजाला एकत्र आणणारी एक चळवळ बनली आहे. या शर्यतीत पडणारे प्रत्येक पाऊल पर्यावरण सुधारणा आणि सामाजिक बंधुभाव यावर सकारात्मक परिणाम घडवून आणणार आहे.

 

याविषयी अधिक माहिती देताना पुना क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक म्हणाले की, पुणे शहरात होणारी अशा प्रकारची ही सर्वात भव्य मॅरेथॉन असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील निसर्ग सुंदर रस्त्यांवरून होणाऱ्या या शर्तीमुळे धावपटूना एक आगळा अनुभव मिळणार आहे..

 

दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टचे जहांगीर दोराबजी म्हणाले की, अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आम्ही करीत असलो तरी, सर्व शासकीय, सर्व प्रायोजक आणि संबंधिताकडून आम्हाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आणि अविश्वसनीय असाच आहे. भविष्यात यापेक्षाही अधिक चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आम्ही करीत आहोत.

 

हि स्पर्धा २१ किमी., १०किमी., ५ किमी. आणि ३ किमी. अशा चार प्रकारात होणार आहे. स्पर्धकांना २१किमी साठी पुणे रेस कोर्स येथून सुरुवात होणार असून अरुण खेत्रपाल रोड, जिजामाता रोड, घोरपडी रोड, बंड गार्डन पोलीस चौकी, रेसिडेन्सी क्लब, अशोक रोड, सदर्न कमांड मार्गे, मनोज पांडे एनक्लेव्ह, लष्कर पोलीस स्टेशन रोड, हायलँड इव्ह, परेड ग्राउंड रोड, गुरुद्वारा रोड, रेस कोर्स ऑफिस येथून पुन्हा पुणे रेस कोर्स मैदानअसा मार्ग पूर्ण करावयाचा आहे.

 

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक व सहभागींना पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सहभागी धावपटूंना टीशर्ट, गुडी बॅग, व्हाउचर याशिवाय शर्यत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला पदक देखील देण्यात येणार आहे. पुणे रेस कोर्स येथून रविवारी (ता. १) सकाळी पाच वाजता २१.१ किमी मॅरेथॉनला सुरुवात होणार असल्याचे रेस डायरेक्टर शैलेश रांका यांनी

सांगितले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments