Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedमेडिकव्हर KLE हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मान-मणक्याची शस्त्रक्रिया; ५८ वर्षीय महिलेला पुन्हा चालण्याची क्षमता

मेडिकव्हर KLE हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मान-मणक्याची शस्त्रक्रिया; ५८ वर्षीय महिलेला पुन्हा चालण्याची क्षमता

 

 

पुणे, जानेवारी २०२६ :

 

Medicover KLE Hospital, पुणे येथे मान-मणक्याच्या गंभीर आजारामुळे चालण्यात अडचण येणाऱ्या ५८ वर्षीय महिलेवर यशस्वीपणे अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचारानंतर तिच्या चालण्याच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

 

सदर रुग्णाला गेल्या दोन महिन्यांपासून चालताना तोल जाणे व असंतुलन जाणवत होते. तपासणीनंतर तिला C4 ते D2 या मणक्यांदरम्यान OPLL (Ossification of Posterior Longitudinal Ligament) मुळे झालेला सर्व्हायकल मायेलोपॅथी हा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. या आजारात मणक्यातील मज्जारज्जूवर दाब येत असल्याने हालचालींवर परिणाम होतो.

 

आवश्यक वैद्यकीय व हृदयविकार तज्ज्ञांकडून तपासणी व परवानगी घेतल्यानंतर न्यूरोसर्जन Dr. Ninad Ramesh Patil यांनी C4 ते D2 दरम्यान Cervical Decompressive Laminectomy ही शस्त्रक्रिया करून मज्जारज्जूवरील दाब यशस्वीपणे कमी केला.

 

ही शस्त्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पार पडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. रक्तदाब नियंत्रण, मधुमेहाचे काटेकोर नियोजन तसेच फिजिओथेरपी सुरू करण्यात आली. उपचारांनंतर रुग्णाच्या खालच्या अंगांची ताकद ४/५ इतकी सुधारली असून ती आधारासह चालू लागली आहे.

 

रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला २९ जानेवारी २०२६ रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील उपचार व तपासणीसाठी नियमित फॉलो-अपचा सल्ला देण्यात आला आहे.

 

यावेळी बोलताना डॉ. निनाद पाटील म्हणाले,

“सर्व्हायकल मायेलोपॅथीच्या रुग्णांमध्ये वेळेवर शस्त्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उशीर झाल्यास कायमस्वरूपी न्यूरोलॉजिकल अपंगत्व येण्याची शक्यता असते.”

 

Medicover KLE Hospital, पुणे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर व बहुवैद्यकीय उपचारपद्धतीच्या सहाय्याने गुंतागुंतीच्या मणक्याच्या व मज्जासंस्थेच्या आजारांवर प्रभावी उपचार देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments