मणिपाल हॉस्पिटल खराडी येथे मल्टिडिसिप्लिनरी कार्यपद्धती आणि अद्ययावत इंटरवेन्शनल प्रक्रियांच्या मदतीने रुग्णाला पूर्णपणे बरे करण्याची खबरदारी घेतली गेली*
*पुणे, फेब्रुवारी २०२६:* कार्डिअॅक अँजिओप्लास्टी झाल्यानंतर फक्त तीन दिवसांनी लघवीवाटे रक्तस्त्राव होण्याच्या प्राणघातक स्थितीला सामोरे जात असलेल्या एका ७० वर्षीय गृहस्थांवर मणिपाल हॉस्पिटल खराडी येथील डॉक्टर्सनी यशस्वी उपचार केले. रुग्णाच्या नेहमीच्या कार्डिओलॉजी चेक-अपदरम्यान ईसीजीमध्ये काही बदल झाला आहे का यासाठी रुग्णाचे मूल्यमापन करण्यात आले व त्यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली.
रुग्णावर डुएल अँटिप्लेटलेट थेरपी सुरू करण्यात आली होती, मात्र तीनच दिवसांत लघवीवाटे रक्त जात असल्याची तक्रार घेऊऩ या रुग्णाने युरोलॉजी बाह्यरुग्ण विभागाला भेट दिली. रुग्णाच्या मूत्राशयामध्ये जवळजवळ ३०० मिलीची गुठळी आहे व त्याचबरोबर प्रोस्टेटचा आकारही सुमारे २५० सीसी इतका प्रचंड मोठा झाल्याचे अधिकच्या तपासणीतून आढळून आले. अँटिप्लेटलेट थेरपी प्रोस्टेटमधून रक्तस्त्राव होण्यास निमित्त ठरली होती व त्यामुळे परिस्थिती नाजूक बनली होती.
गुठळी काढून टाकण्याची व रक्तस्त्राव होत असलेल्या रक्तवाहिन्यांवरील फल्गुरेशनची प्रक्रिया तातडीने पार पाडण्यात आली. ज्यानंतर रुग्णावर जवळून देखरेख ठेवण्यासाठी त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले. प्रारंभिक हस्तक्षेपानंतरही पुन्हा एकदा गुठळी निर्माण झाली व रक्तस्त्राव सुरू राहिला. अँटिप्लेटलेट थेरपी थांबविणे किंवा सुरू ठेवणे या दोहोंमध्येही असलेली मोठी जोखीम लक्षात घेता कार्डिओलॉजी, युरोलॉजी, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी आणि क्रिटिकल केअर विभागातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या मल्टिडिसिप्लिनरी टीमने या केसचे काळजीपूर्वक मूल्यमापन केले.
केसमधील गुंतागुंत विचारात घेऊन डॉ. संतोष पाटील यांनी मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रोस्टेट आर्टरी अँजिओएम्बोलायझेशनची प्रक्रिया पार पाडली, ज्यामुळे रक्तस्त्रावावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. रुग्णाची तब्येत स्थिर झाल्यानंतर त्यांना युरिनरी कॅथेटर लावून घरी सोडण्यात आले. सहा महिन्यांनंतर, अँटिप्लेटलेट थेरपी थांबवणे सुरक्षित असल्याचे निश्चित झाल्यावर रुग्णाच्या प्रोस्टेटच्या वाढलेल्या आकारासाठी प्रोस्टटच्या लेझर इन्युक्लिएशनसह त्यांच्यावर अंतिम उपचार करण्यात आले.
*या केसविषयी बोलताना मणिपाल हॉस्पिटल खराडी, पुणे येथील युरोलॉजी विभागाचे कन्सल्टन्ट डॉ. अंकित शर्मा म्हणाले,* “नुकतेच कार्डिअॅक प्रक्रियांना सामोरे गेलेले वयोवृद्ध रुग्ण जीवनरक्षक अशी रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्याने त्यांच्याबाबतीत रक्तस्त्रावाशी निगडित गुंतागुंती हाताळणे विशेषत्वाने आव्हानात्मक बनते. अशा केसमध्ये रुग्णामध्ये अँजिओप्लास्टीनंतर लगेचच हिमॅटुरिया आणि गुठळी तयार होणे या गोष्टी होतात. तपासणीमधून प्रोस्टेटचा आकार जवळ-जवळ २५० सीसी इतका लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसत होते व ड्युएल अँटिप्लेटलेट थेरपीमुळे रक्तस्त्रावही सुरू झाला होता. ”
|
*ते पुढे म्हणाले* , “रक्त पातळ करणारी औषधे थांबवणे शक्य नसल्याने, प्रोस्टेटचा आकार प्रचंड वाढल्याने आणि वारंवार गुठळी होत असल्याने एक अत्यंत उच्च-जोखमीची स्थिती तयार झाली होती, जिथे पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये अतिशय मोठा धोका होता. या गुंतागुंती असूनही टीमने मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रक्रिया पार पाडली, ज्यात तातडीने गुठळी बाहेर काढणे, प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन, आणि नंतर धोका टळल्यानंतर पार पाडण्यात आलेली लेझर इन्युक्लिएशनची प्रक्रिया यांचा समावेश होता. रक्तस्त्रावावर संपूर्ण नियंत्रण मिळविले गेले व बरे होण्याच्या कालावधीत रुग्णाच्या जीवनमानाच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली.”
लेझर सर्जरीनंतर रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला असून प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. लघवीवाटे रक्त जात असल्यास, विशेषत: रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या वयोवृद्ध रुग्णांच्या बाबतीत असे होत असल्यास त्याकडे कधीही दुर्लक्ष करून नये, यावर डॉक्टरांनी भर दिला.
या केसमधून मणिपाल हॉस्पिटल, खराडी येथे उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान, मिनिमली इऩ्व्हेजिव्ह शस्त्रक्रिया करण्यातील अनुभव कुशलता आणि गुंतागुंतीच्या, उच्च जोखमीच्या केस यशस्वी परिणामांसह हाताळताना वापरली जाणारी मल्टिडिसिप्लिनरी कार्यपद्धती ठळकपणे अधोरेखित होते.


