Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedअभियांत्रिकी क्षेत्रातील नवा आविष्कार! गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपच्या स्टोरेज सोल्युशन्सकडून भारतातील अत्याधुनिक...

अभियांत्रिकी क्षेत्रातील नवा आविष्कार! गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपच्या स्टोरेज सोल्युशन्सकडून भारतातील अत्याधुनिक स्वयंचलित गोदामाची यशस्वी निर्मिती

 

१२० फूट उंच स्वयंचलित रॅक-क्लॅड सुविधा भारतात पहिल्यांदाच उभारण्यात आली आहे. गोदरेज समूहाने या प्रकल्पाद्वारे देशातील औद्योगिक

पायाभूत सुविधांना पुढील तंत्रज्ञानशी जोडले असून, ही सुविधा आत्मनिर्भर भारत आणि आधुनिक उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२६: गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपच्या स्टोरेज सोल्युशन्ल विभागाने आज नवी अत्याधुनिक

गोदामाची उभारणी केल्याचे जाहीर केले. कंपनीने देशातील अत्याधुनिक ऑटोमेडेट (स्वयंचलित) रॅकिंग सिस्टीम रॅक-

क्लॅड गोदाम स्थापन केले आहे. देशातील नामांकित औषधनिर्माण कंपनीच्या उत्पादनांसाठी हे अत्याधुनिक गोदाम

विकसित करण्यात आले आहे. भारतात झपाट्याने विकसित होत असलेल्या उत्पादन क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या

दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे मालाची साठवणूक आणि

व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करता येणे आता शक्य होणार आहे.

सुमारे १२० फूट (३६ मीटर) उंच असलेले हे हाय बे ऑटोमेटेड रॅक क्लॅड गोदाम संपूर्णपणे भारतात विकसित करण्यात

आले आहे. संपूर्ण सोयीसुविधांनी सुसज्ज असे अत्याधुनिक गोदाम हे देशातील अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना

आहे. यामध्ये स्टॅक्चरल रॅकिंग, ऑटोमेशन आणि क्लॅडिंग या तिन्ही घटकांचे एकाच प्रणालीमध्ये संकलन करण्यात आले

आहे. केवळ ११ हजार ४९० चौरस फूट इतक्या मर्यादित जागेत हा गोदाम उभारला गेला आहे. या गोदामात ६ हजार

३१६ पॅलेट्स ठेवण्याची क्षमता आहे. फारसा मानवी हस्तक्षेप न होता मालाची साठवणूक आणि ने-आण करणे

स्वयंचलित पद्धतीने शक्य झाले आहे. ही प्रणाली मालाची अचूकता, कार्यक्षमता आणि मागोवा घेण्याची प्रक्रिया अधिक

सक्षम करते. परिणामी, औधष निर्मिती क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील कामकाजाचा तातडीच्या गरजांची वेळेवर

यशस्वी पूर्तता होते.

२१६ फूट (६६ मीटर) लांब आणि ५६ फूट (१७ मीटर) रुंद असलेल्या या भव्य संरचनेमुळे ही जागा उभ्या रेषेत

वापरण्यात आली आहे. या पद्धतीचा वापर करुन गोदामात उत्पादनांची साठवणूक क्षमता वाढवण्याची योजना

आखण्यात आली आहे. या अत्याधुनिक रचनेमुळे जमिनीचा अतिरिक्त वापर होत नाही, बांधकामासाठी जास्त वेळ

लागत नाही तसेच व्यवसायाचा विस्तार करणेही शक्य होते. कमी जागेत जास्त मालाची साठवणूक करण्याचे तंत्रज्ञान

भविष्यातील औद्योगिक गरजांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपच्या स्टोरेज सोल्युशन्स विभागाचे बिझनेस हेड विकास चौदाहा म्हणाले, ‘‘नाविन्यपूर्ण

संकल्पनांना ध्येयाची जोड मिळाल्यास भारतीय अभियांत्रिकी उत्पादन क्षेत्रात मोठी उंची गाठता येते. हा प्रकल्प याचे

उत्तम उदाहरण आहे. गोदरेज एन्टरप्राजजेस ग्रुपमध्ये आम्ही पायाभूत सुविधांकडे केवळ व्यावसायिक प्रकल्प म्हणून न

पाहता, देशातील प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदान म्हणून पाहतो. पहिल्यांदाच उभारलेले एआरएस रॅक क्लॅड

अत्याधुनिक गोदाम हे कमी जागेत जास्त साठवणूक, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता प्रदान करते. हे देशातील आर्थिक

वाढीसाठी महत्त्वाच्या उद्योगांना भविष्यकालीन आव्हानांसाठी सज्ज करणारी सोल्युशन्स देण्याच्या आमच्या

वचनबद्धतेचे प्रतीक आहे.’’

या अत्याधुनिक गोदामाच्या उभारणीचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात आले आहे. हे काम अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने

अचूकतेने, उच्च सुरक्षा मानके आणि अभियांत्रिकी कौशल्याची जोड देत पूर्ण केली गेली. शेवटच्या टप्प्यात या संरचनेला

चहूबाजूंनी वेढून त्याचे रुपांतर एका पूर्णपणे बंदिस्त आणि स्वतंत्र अशा स्वयंचलित गोदामात करण्यात आले. या संपूर्ण

प्रक्रियेत इंजिनीअरिंमधील शिस्त आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले असून, हे गोदाम

आता वापरासाठी सज्ज झाले आहे.

 

Public

 

भारताची औषध निर्माण उद्योग हे देशाच्या जागतिक व्यापार आणि उत्पादन क्षमतेचा मुख्य आधारस्तंभ असून,

२०४७ पर्यंत हे क्षेत्र ४५० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा गाठेल, असा अंदाज आहे. या वेगाने होणा-या वाढीसाठी

हाय-बे गोदामांसारख्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची गरज भासणार आहे. अशा प्रकारची अत्याधुनिक गोदामे

मालाची जलद, सुरक्षित आणि मोठ्या प्रमाणावरील हाताळणी सुलभ करुन या क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण उत्प्रेरक

ठरतील. परिणामी, औषध उद्योगाची कार्यक्षमता जागतिक दर्जाची होण्यास मदत होईल.

या ऐतिहासिक प्रकल्पामुळे गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपच्या स्टोरेज सोल्युशन्स विभागाने राष्ट्र उभारणीत आपला

मोलाचा वाटा पुन्हा अधोरेखित केला आहे. जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती करुन, हा समूह

भारताच्या उत्पादन क्षेत्रातील परिसंस्था अधिक बळकट करत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारताची औद्योगिक

क्षमता स्थानिक पातळीसह जागतिक स्तरावरही उंचावली गेली आहे. या औद्योगिक विकासातून देशाची प्रतिमा

आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकास पात्र ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments