Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गृह -संवाद अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस पटू अंकिता...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गृह -संवाद अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस पटू अंकिता रैना ह्यांची निवासस्थानी भेट संघ शताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन.

 

 

पुणे ( प्रतिनिधी )

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष झाल्या निमित्त देशभर व देशाबाहेर विविध उपक्रम राबविले जात आहेत.त्याअंतर्गत कर्वेनगर मधील “गृह – संवाद” कार्यक्रमानिमित्त कर्वेनगर निवासस्थान असलेल्या

*आंतर राष्ट्रीय लॅान टेनिसपटू व २०१८ च्या अर्जुन ॲवॅार्ड विजेत्या अंकिता रैना* यांची पश्चिम क्षेत्र संपर्क प्रमुख कैलास सोनटक्के,कर्वेनगर संघचालक उदयन पाठक, गिरीजा शंकर,नटराज वस्ती

सह सयोंजिका संजीवनी महाजन, कर्वेनगर संपर्क प्रमुख अनिल वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस पटू अंकिता रैना यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लॉन -टेनिस स्पर्धांमध्ये वैयक्तिक आणि सामुहिक यश प्राप्त केले आहे. त्यातील उल्लेखनीय कार्य याप्रमाणे –

# WTA टूरमध्ये एक आणि WTA १२५ स्पर्धा (दोन्ही दुहेरीत)

# ITF सर्किटमध्ये ११ एकेरी आणि ३० दुहेरी जेतेपदे.

# एप्रिल २०१८ मध्ये, त्यांनी पहिल्यांदाच एकेरी क्रमवारीत टॉप २०० मध्ये प्रवेश केला आणि ही कामगिरी करणारी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या फक्त पाचव्या खेळाडू ठरल्या.

# २०१६ च्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी स्पर्धांमध्ये सुवर्णपदके

# २०१८ च्या आशियाई खेळांमध्ये एकेरीमध्ये कांस्यपदक.

# WTA टूर-स्तरीय जेतेपद जिंकणाऱ्या भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फक्त दोन महिलांपैकी रैना एक आहेत.

ह्या प्रसंगी अंकिता रैना सोबत त्यांचे बंधू अंकुर रैना व मातोश्री उपस्थित होत्या.

कैलासजी सोनटक्के यांनी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या कार्याची,सेवा उपक्रमाची व पंचपरिवर्तना विषयी सविस्तर माहिती दिली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गृह-संवाद अभियानाच्या माध्यमातून हजारो घरातील लाखो लोकांशी संपर्क साधण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कैलास सोनटक्के यांनी अंकिता रैना हिला ‘ *पंचपरिवर्तन पुस्तक’ व त्यांच्या बंधूंना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वर्णिम भारत के दिशा सूत्र* पुस्तके व भारतमातेच्या प्रतिमेचे कार्ड भेट स्वरूपात दिले.

रैना कुटुंब पुण्यातील अन्य काश्मिरी कुटुंबे आणि नगर रस्त्यावरील कश्मीर भवनाच्या संपर्कात आहेत.

रैना कुटुंबियांशी पाऊण तासापेक्षा जास्त वेळ संवाद झाला.

“कर्वेनगर येथील गिरिजा शंकर, नटराज वस्तीच्या हिंदू संमेलनाला पुण्यात असल्यास आवर्जून उपस्थित राहीन “असे अंकिता रैना हिने सांगितले.

  1. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्वेनगर चे संघचालक उदयन पाठक,गिरिजा शंकर, नटराज वस्ती सहसंयोजिका संजीवनी महाजन,कर्वेनगर संपर्क प्रमुख अनिल वाघ हे उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments