पुणे,३ मार्च 2026 : नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर येथे 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन अवयवदानांमुळे पाच जणांना नवजीवन मिळाले. फुरसुंगी येथील 32 वर्षीय मेंदूमृत शेतकऱ्याने दोन जणांना नवजीवन दिले,तर चिंचवड येथील 52 वर्षीय मेंदूमृत व्यावसायिकाने तीन जणांना नवजीवन दिले. दोन्ही परिस्थितींमध्ये रूग्णांना मेंदूतील रक्तस्त्रावानंतर (आयसी ब्लीड) 11 फेब्रुवारी रोजी मेंदूमृत घोषित करण्यात आले.
नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे म्हणाले की, कुटुंबियांची संमती मिळाल्यानंतर 32 वर्षीय व्यक्तीची दोन्ही मुत्रपिंडे 11 फेब्रुवारी रोजी काढण्यात आली. त्यापैकी एक मुत्रपिंड नाशिक येथे पाठविण्यात आले,तर दुसरे मुत्रपिंड दीर्घकालीन मुत्रपिंड विकाराने ग्रस्त असलेल्या 59 वर्षीय रुग्णावर नोबल हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. 52 वर्षीय मेंदूमृत पुरूषाचे दोन मुत्रपिंड आणि यकृत काढण्यात आले. त्यापैकी एक मुत्रपिंड पुण्यातील दुसऱ्या रूग्णालयात पाठविण्यात आले,दुसरे मुत्रपिंड नाशिक येथे पाठविण्यात आले.तसेच यकृताच्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असलेल्या 58 वर्षीय रूग्णावर नोबल हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपित करण्यात आले.यकृत प्रत्यारोपण झालेल्या रूग्णाला 25 फेब्रुवारी 2026 रोजी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याआधी 9 फेब्रुवारीला 60 वर्षीय मेंदूमृत महिलेने चार जणांना नवजीवन दिले. दीर्घकालीन यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या 45 वर्षीय पुरूषावर हे यकृत प्रत्यारोपित करण्यात आले.यामुळे तीन दिवसांत तीन अवयवदानांसह अनेक रूग्णांना नवजीवन मिळाले.
मुत्रपिंड प्रत्यारोपण टीममध्ये प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ.शशिकांत भणगे,डॉ.विक्रम सातव,भूलतज्ञ डॉ.निलेश वसमतकर आणि डॉ.पल्लवी भुटियानी यांचा समावेश होता. यकृत प्रत्यारोपण टीममध्ये शल्यचिकित्सक डॉ.मनोज श्रीवास्तव,डॉ.स्मिता पारख आणि भूलतज्ञ डॉ.श्रीकांत कोटे यांचा समावेश होता.या टीममध्ये प्रत्यारोपण समन्वयक महेश तुपे आणि आश्विनी कवडे यांचाही सहभाग होता.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर ने आपली अवयव प्रत्यारोपण सेवा अधिक विस्तारली आहे. याला बहुशाखीय सुविधांचे पाठबळ असून कुशल शल्यचिकित्सक,हेपॅटोलॉजिस्ट,भूलतज्ञ,रेडिओलॉजिस्ट तसेच इतर आरोग्यसेवा तज्ञांची टीम सहयोगाने संपूर्ण प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचे प्रयत्न सातत्याने कर
- त असते.


