Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedफिजीओ निन्जा ' ' या संघटनेतर्फे नुकतेच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

फिजीओ निन्जा ‘ ‘ या संघटनेतर्फे नुकतेच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .

पुणे , दि . ३ : रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत , या सामाजिक जाणिवेतून ‘ फिजीओ निन्जा ‘ ‘ या संघटनेतर्फे नुकतेच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .

डीपी रस्त्यावर झालेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील ६० स्पर्धक सहभागी झाले होते .

स्पर्धकांना स्पर्धेच्या आधी व नंतर फिजीओ थेरपी तत्वे समजावून व्यायाम प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली .

फिजीओ निन्जा ग्रुपचे संस्थापक सभासद राजेशरी चांडक , सुमती शर्मा आणि सूजल तापडिया यांनी सामाजिक जाणिवेतून आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी अनेक स्पर्धकांनी धन्यवाद व्यक्त केले.

जीवनशैली शी संबंधित रोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे . स्थूलता ‘मधुमेह , हृदयरोग ‘ उच्च रक्तदाब आदी रोगांना नियंत्रणात आणावयाचे असल्यास व्यायामाला पर्याय नाही . अंथरुणाला खिळून राहणाऱ्या रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते . ही वेळ रुग्णांवर येऊ नये म्हणून वेळीच जीवन शैली बदलण्याची गरज आहे . ह्या मॅरेथॉन मध्ये बव्हंशी स्पर्धकांची ही पहिली मॅरेथॉन होती . यामध्ये कन्हैया तापडिया यांना प्रथम , अमित बिहाणी द्वितीय आणि विभा भट्टड यांनी तृतीय क्रमांक पटकावला . फिजीओ निन्जा ग्रुप यापुढे अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणार आहे , अशी माहिती आयोजकांनी दिली .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments