Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रविण मसालेवाले यांनी मुघलकालीन स्वयंपाकघरांपासून प्रेरित ‘सुहाना नूर’ श्रेणीचे सादरीकरण केले

प्रविण मसालेवाले यांनी मुघलकालीन स्वयंपाकघरांपासून प्रेरित ‘सुहाना नूर’ श्रेणीचे सादरीकरण केले

 

पुणे: भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या मसाले व फूड सोल्युशन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या प्रविण मसालेवाले यांनी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत ‘सुहाना नूर’ ही नवीन मिश्र मसाल्यांची श्रेणी सादर केली आहे. घरगुती स्वयंपाकासाठी पारंपरिक मुघलाई पाककृतींचे अस्सल स्वाद पुन्हा अनुभवता यावेत, या उद्देशाने ही मसाल्यांची श्रेणी विकसित करण्यात आली आहे.

भारतीय पाककला ही 8000 पेक्षा अधिक वर्षांच्या इतिहासात विविध प्रेरणा व संस्कृतींच्या प्रभावातून घडलेली एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संगमकला आहे. देशाची खाद्यपरंपरा प्राचीन संस्कृतींमधून उगम पावली असून, पुढील काळात तिच्यावर पाश्चिमात्य आशिया व पर्शियन संस्कृतींचा प्रभाव पडला. त्यानंतर मुघल आणि ब्रिटिश काळातील प्रभावांनी भारतीय पाककलेला अधिक व्यापक स्वरूप दिले. काळाच्या ओघात मुघलाई पाककला भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे—मग ते कोरमा व करींच्या रूपात असो, टिक्का व कबाबांच्या स्वरूपात असो किंवा सर्वाधिक लोकप्रिय अशा बिर्याणीच्या विविध प्रकारांमध्ये असो.

मुघलाई पाककलेचा गाभा तिच्या संथ शिजवण्याच्या प्रक्रियांमध्ये दडलेला आहे, ज्यामुळे पदार्थांचे नैसर्गिक स्वाद खुलून येतात तसेच स्तरित ग्रेव्हीज्‌ना वैशिष्ट्यपूर्ण गहिरा स्वाद प्राप्त होतो. मात्र, या सर्वांत सर्वाधिक महत्त्वाची भूमिका विविध मसाल्यांच्या अचूक मिश्रणाची असते, कारण हेच मसाले प्रत्येक पदार्थाचा अस्सल व पारंपरिक स्वाद जिवंत करून आणतात.

सुहाना नूर ही श्रेणी ग्राहकांना अशा मसाल्यांची निवडक मालिका सादर करण्याचा प्रयत्न करते, ज्यांच्या सहाय्याने मुघलाई पाककलेतील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ घरच्या घरी सहजपणे तयार करता येतात आणि तरीही त्या पदार्थांचा अस्सल व पारंपरिक स्वादानुभव कायम राखला जातो.

ही श्रेणी अशा ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सादर करण्यात आली आहे, ज्यांना मुघलाई पदार्थ तयार करणे व आस्वाद घेणे आवडते, मात्र सध्या बाजारात उपलब्ध इतर मसाल्यांच्या तुलनेत अधिक अस्सल आणि प्रामाणिक स्वादानुभवाची अपेक्षा असते. सुहाना नूर मुघलकालीन स्वयंपाकघरांतील पारंपरिक पाककृतींचा अनुभव पुन्हा उलगडणाऱ्या, विशेष प्रकारच्या मसाल्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी सादर करते.

या श्रेणीत बिर्याणी, ग्रेव्हीज्‌ आणि स्टार्टरसाठी खास तयार करण्यात आलेले मसाल्यांचे मिश्रण समाविष्ट आहे. त्यामध्ये शाही बिर्याणी मसाला, बॉम्बे बिर्याणी मसाला, सिंधी बिर्याणी मसाला, चिकन कोरमा मसाला, मटण कोरमा मसाला, कडाही मसाला, आचार गोश्त मसाला, दालचा/दाल गोश्त मसाला, निहारी मसाला, शामी कबाब मसाला आणि सीख कबाब मसाला यांचा समावेश आहे.

मुघलाई स्वयंपाकघरांच्या भव्यतेपासून आणि शतकानुशतके चालत आलेल्या पाकपरंपरेपासून प्रेरणा घेत, प्रत्येक मसाल्याचे मिश्रण कंपनीच्या आरअँडडी टीमने दोन वर्षांहून अधिक काळ केलेल्या सखोल संशोधनातून काळजीपूर्वक विकसित करण्यात आले आहे. या प्रक्रियेत मुघलाई इतिहासाचा सखोल अभ्यास, प्रादेशिक स्वयंपाक पद्धतींचे विश्लेषण तसेच तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात आली, जेणेकरून या पाककलेचे राजेशाही स्वाद प्रामाणिकपणे पुन्हा साकारता येतील. यासाठी केवळ सर्वोत्तम दर्जाच्या घटकांची निवड करण्यात आली असून, बिर्याणीसारख्या काही निवडक मिश्रणांमध्ये सुकवलेल्या आलुबुखाऱ्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आला आहे—जे पारंपरिकपणे चवीला सखोल करणे आणि सौम्य गोडसरपणा देण्यासाठी वापरले जातात. संपूर्ण श्रेणीचे उत्पादन कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रांमध्ये करण्यात येतात, जेथे परंपरेचा वारसा आणि आधुनिक दर्जा मानके यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.

या सादरीकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रविण मसालेवालेचे स्ट्रॅटेजी, मार्केटिंग आणि फायनान्सचे संचालक श्री. विशाल चोरडिया म्हणाले, “सुहानामध्ये आम्ही नेहमीच स्थानिक चवींच्या अनुरूप अशी उत्पादने विकसित करण्यावर भर दिला आहे—मग ती आमची गुजरात स्पेशल श्रेणी असो किंवा कर्नाटक स्पेशल उत्पादने. विशेषतः घरच्या घरी वाढत्या प्रमाणात तयार केल्या जाणाऱ्या मांसाहारी पदार्थांसाठी, विशिष्ट पाककलेनुसार तयार केलेल्या मसाल्यांच्या मिश्रणांची मागणी सातत्याने वाढत आहे. सुहाना नूरच्या माध्यमातून आमचा उद्देश लोकप्रिय मुघलाई पाककृती तयार करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा आहे, त्याच वेळी त्यांच्या अस्सल आणि सखोल चवीचा आत्मा कायम राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रेस्टॉरंट्समध्ये प्रचंड लोकप्रिय असतानाही, पॅकेज्ड मसाल्यांच्या श्रेणीत मुघलाई पाककलेचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी आहे. ही नवीन श्रेणी दैनंदिन घरगुती स्वयंपाकासाठी सोयीस्कर आणि परवडणाऱ्या मसाल्यांच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करते.”

सुहाना नूर ही श्रेणी निवडक बाजारपेठांमध्ये जनरल ट्रेड तसेच मॉडर्न रिटेल आउटलेट्समध्ये टप्प्याटप्प्याने सादर करण्यात येत असून, ती प्रमुख ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध आहे. मूल्यवर्धित मसाला मिश्रणांच्या क्षेत्रातील कंपनीच्या वाढीच्या धोरणाचा एक भाग म्हणून, येत्या काही महिन्यांत या श्रेणीचे वितरण अधिक व्यापक पातळीवर विस्तारण्याची योजना आहे.

प्रविण मसालेवाले ही रेडी-टू-कूक मसाला मिश्रणांच्या क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी असून, देशांतर्गत तसेच अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अस्सल चव आणि स्वयंपाकातील सोयीचा संगम साधणाऱ्या 40 हून अधिक प्रकारांची श्रेणी ती सादर करते. कंपनीच्या ब्रँड पोर्टफोलिओमध्ये सुहाना, अंबारी आणि सर्वम यांसह, तिचा प्रमुख लोणच्यांचा ब्रँड प्रविण यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments