Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅमेझॉन एमएक्स प्लेयरद्वारे ‘संकल्प’चा ट्रेलर प्रसिद्ध; प्रकाश झा यांच्या सत्ताखेळावरील सामाजिक-राजकीय थ्रिलरमध्ये...

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरद्वारे ‘संकल्प’चा ट्रेलर प्रसिद्ध; प्रकाश झा यांच्या सत्ताखेळावरील सामाजिक-राजकीय थ्रिलरमध्ये नाना पाटेकर झळकणार

जिओ स्टुडिओचे सादरीकरण आणि ए पीजेपी फिल्म्स निर्मित, संकल्प अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर दिनांक 11 मार्चपासून मोफत स्ट्रीम होणार

 

 

 

मुंबई, 05 मार्च 2026: भारताची अग्रगण्य मोफत, दर्जेदार, अॅड-सपोर्टेड व्हीडिओ स्ट्रिमिंग सेवा असणाऱ्या अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने आज आपल्या आगामी सामाजिक-राजकीय थ्रिलर संकल्प’चा दमदार ट्रेलर लॉन्च केला. या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे बहुप्रतिक्षित स्ट्रिमिंग पदार्पण झाले. प्राचीन चाणक्य-चंद्रगुप्ताच्या इतिहासापासून प्रेरित, ही मालिका आधुनिक भारताच्या राजकीय धोरणाची नव्याने कल्पना करते. जिथे फक्त काळ बदल दिसून येईल. या ट्रेलरमध्ये संस्कार, सत्ता आणि समर्पण या तीन शक्तींनी आकार घेतलेल्या जगात लक्षवेधी प्रवेश दाखवण्यात आला आहे. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या सिरीजमध्ये संजय कपूर, मोहम्मद झीशान अयूब, नीरज काबी, कुब्रा सैत, क्रांती प्रकाश झा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जिओ स्टुडिओजसाठी ज्योती देशपांडे आणि पीजेपी फिल्म्स प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली दिशा झा निर्मित ‘संकल्प’ या कलाकृतीचा प्रीमियर 11 मार्च रोजी खास अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर होणार आहे.

 

 

 

जिओ स्टुडिओचे सादरीकरण असलेली ही तडफदार मालिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते प्रकाश झा दिग्दर्शित आणि निर्मित आहे. राजकीय सत्ताकेंद्रांवर आधारित, ही कथा मात साब या प्रभावशाली शिक्षकाची ओळख करून देते. ज्याचे अधिकार मूल्ये, निष्ठा आणि अतूट भक्तीवर अवलंबून असतात. महत्त्वाकांक्षेची नैतिक किंमत आणि मार्गदर्शन तसेच वर्चस्व प्रस्थापित करणे यांच्यातील धूसर रेषा उघड करून, मार्गदर्शक आणि शिष्य यांच्यातील आवेशपूर्ण संघर्षासह ट्रेलर स्थिरपणे तयार होतो. त्यातून निर्माण होणारा संघर्षच, विद्यार्थी हा गुरूच्या विरोधात उठतो की नाही हे दर्शविण्याकरिता प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवतो.

 

 

 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, “मात साबची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी खूप मोठे शिक्षण घेण्यासारखे आहे. यामुळे मला एक नवीन आयाम शोधण्याची प्रेरणा मिळाली. शांतता, संघर्ष आणि परिणामांनी भरलेले हे पात्र आहे. प्रकाश झा यांच्यासोबत पुन्हा काम करणे नेहमीच खास असते, कारण ते अशा कथा घेऊन येतात ज्या सर्वकाही स्पष्ट करत नाहीत. पण त्या जगाचं प्रतिबिंबित करतात आणि ते तुमच्याबरोबर राहतात. अखेरीस, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी अधिक खास ठरतो कारण मी अॅमेझॉन एमएक्स प्लेयरद्वारे ओटीटी जगात पदार्पण करत आहे. प्रेक्षकांना संकल्पाचे जग अनुभवण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.”

 

 

 

या सिरीजबद्दल बोलताना, अॅमेझॉन एमएक्स प्लेयरचे डायरेक्टर आणि कंटेंट हेड अमोघ दुसाद म्हणाले, “संकल्प हा एक तीक्ष्ण, समकालीन सामाजिक-राजकीय थ्रिलर आहे. यामधील व्यक्तिरेखा ‘लार्जर दॅन लाईफ’ आहेत; ज्या शक्ती, विश्वास आणि प्रेरणा यांचा शोध घेतात. ही मालिका अर्थपूर्ण संभाषणांना चालना देणाऱ्या सांस्कृतिकदृष्ट्या मूळ असलेल्या कथांवर आपले लक्ष केंद्रित करते. प्रकाश झा यांनी अनेक प्रभावी कथांची निर्मिती केली आहे. त्यांच्यासोबतचे आमचे दीर्घकालीन सर्जनशील सहकार्यही यात कायम आहे. नाना पाटेकर अॅमेझॉन एमएक्स प्लेअरसह स्ट्रीमिंगमध्ये पदार्पण करत असल्याने त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.”

 

 

 

दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झा म्हणाले, “कथाकथन हा जबाबदारीचा भाग आहे यावर माझा कायमच विश्वास आहे. त्या विश्वासावर संकल्प बांधला जातो. शक्ती, हेतू आणि परिणामांची तपासणी अशा प्रकारे केली जाते जी प्रेक्षकांसोबत राहते. अॅमेझॉन एमएक्स प्लेयर आणि जिओ स्टुडिओज यांच्या सहकार्याने हा दृष्टिकोन दूरदूरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला आहे. ज्यामुळे महत्त्वाच्या कथेचा प्रभाव वाढला. जेव्हा एखादी कथा आपल्या जगाच्या समजुतीला आव्हान देणारे प्रश्न मागे सोडते तेव्हा ती खरोखरच यशस्वी होते.”

 

 

 

संकल्प 11 मार्चपासून अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत स्ट्रीम होईल. जे मोबाईलवरील अॅप्स, अॅमेझॉनचे शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि कनेक्टेड टीव्हीद्वारे उपलब्ध असेल.

 

 

 

Trailer Link: https://youtu.be/sjgRAP

aSoZ4?si=vmBQNOXUr5Ol_7WR

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments