Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*पंचपरिवर्तनाद्वारे विश्वगुरू भारत घडावा* *दिलीप क्षीरसागर यांचे आवाहन*

*पंचपरिवर्तनाद्वारे विश्वगुरू भारत घडावा* *दिलीप क्षीरसागर यांचे आवाहन*

 

 

*पुणे* : विश्वगुरू भारत बनण्यासाठी सामान्य नागरिकांनी पंचपरिवर्तनाचे आचरण करणे आवश्यक आहे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी केले.

 

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्यावतीने श्री तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात संघशताब्दी निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने संघकार्याचा आढावा घेताना क्षीरसागर पुढे म्हणाले की समाज संघटनेचे महत्त्व हिंदू समाजाला समजलेले असल्यामुळे आता हिंदू समाज समर्थन व सहभाग देत आहे. संघशताब्दी वर्षात सामान्य नागरिकांनी वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात पंचपरिवर्तनाच्या आचरणाचे महत्त्व त्यांनी प्रतिपादन केले.

 

स्वबोधद्वारे भारतीय परंपरांचा अभिमान आग्रह व आचरण महत्त्वाचे असून सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी समरसतेचा भाव मनात जागृत करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन व प्लास्टिक मुक्ती हे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.

 

कुटुंब व्यवस्था हि आपल्या सामाजिक शक्तीचा एक महत्त्वाचा घटक असून कुटुंबातील पुढच्या पिढीला आपल्या परंपरा व आपल्या संस्कृतीचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे कुटुंब प्रबोधनाचे प्रमुख कार्य आहे. संविधानाने दिलेले हक्क सर्वांना लक्षात येतात परंतु नागरी कर्तव्याचे पालन करणे देखील आवश्यक आहे.

 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी व विश्वस्त श्रीमती सुलभा शिरगावकर उपस्थित होते. विश्वस्त चिटणीस सुनील पारखी यांनी प्रास्तावित केले. यावेळी कार्याध्यक्ष जयंत देशपांडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments