पुणे, दि. १०: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरुपात करता येईल. हे ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
त्रुटी किंवा आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता १७ मार्च २०२६ पर्यंत मुदत राहील. मुदतीनंतर प्राप्त झालेले निवेदन स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी, आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी कळविली आहे.
0000


