Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय आता आपल्‍या स्वतःच्या भाषेत प्रवासाचे पर्याय शोधू लागले आहेत: मेकमायट्रिप

भारतीय आता आपल्‍या स्वतःच्या भाषेत प्रवासाचे पर्याय शोधू लागले आहेत: मेकमायट्रिप

 

मेकमायट्रिपचे जेन-एआय ट्रिप प्लॅनिंग असिस्टंट मायरावरील २० लाख व्हॉईस संभाषणांमधील डेटामधून निदर्शनास येते की, व्हॉईस क्वेरीज आता प्रवासाच्या अधिक समृद्ध आणि संदर्भासहित हेतूवर आधारित आहेत. सुरुवातीच्या कलानुसार, मजकूर शोधण्यापेक्षा भारतीय भाषांमध्ये व्हॉईस सर्चचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे, व्‍यक्ती आता अधिक नैसर्गिकरित्या संवाद साधत असल्याचे दिसून येत आहे.

गुरूग्राम, मार्च ९, २०२६ – मेकमायट्रिप या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने आज त्यांचा जेन-एआय आधारित ट्रिप प्लॅनिंग असिस्टंट ‘मायरा’कडून मिळालेली निरीक्षणे सादर केली. या निरीक्षणांमधून भारतातील प्रवासी व्‍हॉईसद्वारे (आवाजाद्वारे) संवाद साधण्यास सुरुवात करत आहेत, यातून नवीन उदयोन्मुख कल दिसून येतो. मायराचा वापर करणाऱ्यांची संख्या अजूनही वाढत आहे, सध्या दररोज ५०,००० हून अधिक संभाषणे याद्वारे होत आहेत. सुरुवातीच्‍या डेटामधून निदर्शनास येते की, व्हॉईस सर्चमुळे प्रवासाचा शोध घेणे अधिक अभिव्यक्त, संदर्भासहित आणि भाषिकदृष्ट्या सर्वसमावेशक झाले आहे, जे वापरकर्त्‍याच्‍या नेहमीच्या टेक्स्ट सर्चच्या (टाइपिंग करून शोधण्याच्या) पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

व्हॉईस आणि टेक्स्ट सर्चमधील वाढता फरक

वापराच्या सुरुवातीच्या टप्प्यातही वापरकर्ते प्रवासाचे नियोजन करण्यासाठी टाइप करताना आणि बोलताना कशा प्रकारे वेगळा विचार करतात, यातील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे. बहुतांश टेक्स्ट सर्च हे केवळ ३ ते ४ शब्दांचे, संक्षिप्त आणि मुख्य शब्दांवर आधारित असतात. जसे, “गोवा हॉटेल्स स्वस्त” किंवा “दिल्ली मुंबई फ्लाईट”. याउलट, व्हॉईस क्वेरीज (आवाजाद्वारे शोधणे) लक्षणीयरित्या वेगळ्या दिसू लागल्या आहेत. मजकूराद्वारे शोधताना फक्त ७ टक्‍के व्‍यक्ती सविस्तर लिहितात, तर व्हॉईस सर्चमध्ये जवळपास २३ टक्‍के क्वेरीज ११ शब्दांपेक्षा जास्त मोठ्या असतात. याचे कारण म्हणजे, वापरकर्ते बोलताना नैसर्गिकरित्या ठिकाणाचे अंतर, सोयीसुविधा, बजेट, लोकांची संख्या आणि तारखा या सर्व गोष्टी एकाच वेळी स्पष्टपणे सांगतात. उदाहरणार्थ, “मला उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्याजवळील स्विमिंग पूल असलेली स्वस्त हॉटेल्स दाखवा” किंवा “२ प्रौढ आणि एक मूल, १४ जानेवारीपासून ३ रात्रींसाठी, दर रात्री १५,००० रुपयांच्या आतील बजेट असलेली ठिकाणे सुचवा.”

अनेक शोध श्रेणींमध्ये (क्वेरी श्रेणी), सुरुवातीच्‍या डेटामधून निदर्शनास येते की टेक्स्टच्या तुलनेत व्हॉईसचा वापर लक्षणीयरित्या जास्त आहे. यामध्ये तारखेनुसार केल्या जाणाऱ्या शोधात सर्वात मोठा फरक दिसून आला आहे, व्हॉईस सर्चचा वापर ३.३ पटीने जास्त आहे. वापरकर्ते तारखेचे ठराविक फॉरमॅट टाइप करण्याऐवजी “२६ ते २९ डिसेंबर” किंवा “पुढच्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत” असे बोलण्याला पसंती देत आहेत.

माहितीपर प्रश्न, ज्‍यामध्‍ये वापरकर्ते विशिष्ट प्रक्रिया किंवा सेवांबद्दल मार्गदर्शन किंवा स्पष्टीकरण शोधत असतात, अशा प्रश्नांसाठी व्हॉईसचा (आवाजाचा) वापर मजकूराच्या तुलनेत २.७ पटीने जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच निदर्शनास येते की, वापरकर्ते आता फक्त व्यवहारापुरता शोध न करता सविस्तर माहिती मिळवण्यासाठी संभाषणात्मक मदतीकडे वळत आहेत. व्‍यक्ती आपल्‍या भाषांमध्‍ये प्रश्न विचारत आहेत, जसे हिंदीमध्‍ये “सऊदी का वीज़ा कैसे मिलेगा?” (सौदीचा व्हिसा कसा मिळेल?); बंगालीमध्‍ये “আমি আগরতলা থেকে ভুবনেশ্বর যাবো তেইশে মার্চ। আমি জানতে চাই, ১৪ মাসের বেবির জন্য কি আলাদা ফ্লাইট টিকিট করতে হবে?” (मी २३ मार्चला आगरतळ्याहून भुवनेश्वरला जाणार आहे. १४ महिन्यांच्या बाळासाठी मला वेगळे फ्लाइट तिकीट काढावे लागेल का?); मराठीमध्‍ये “कोल्हापूर ते दिल्ली जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे व किती दिवस लागतात आणि ती कोणकोणत्या वारी असते?”; कन्‍नडमध्‍ये “ಜಪಾನ್‌ಗೆ ಪ್ರಯಾಣಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಮೊದಲು ಯಾವ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಬೇಕು?” (जपानला सहलीला जाण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतात?); तमिळमध्‍ये “வீல் சேர் எப்படி புக் பண்ணனும்னு சொல்லு?” (व्हीलचेअर कशी बुक करायची ते सांगा?”); तेलुगुमध्‍ये “మీరు తిరుపతి దేవాలయాన్ని సందర్శించాలంటే హోటల్ ఎక్కడ బుక్ చేసుకోవాలి?”(मला तिरुपती मंदिराला भेट द्यायची असेल, तर हॉटेल कोठे बुक करावे?).

ठिकाण-विशिष्ट प्रश्न एकूण व्हॉईस सर्चपैकी २५.१% आहेत आणि मजकूराच्या तुलनेत व्हॉईसवर याचा वापर १.५ पटीने जास्त आहे. यामध्ये वापरकर्ते “समुद्रकिनाऱ्याजवळ”, “सुवर्ण मंदिरापासून चालत जाण्याइतक्या अंतरावर” किंवा “ऋषिकेशमध्ये गंगा नदीचे दर्शन घडणारे” अशा शब्दांमधून विशिष्ट ठिकाणांशी असलेले अंतर किंवा जवळीक नैसर्गिकरित्या व्यक्त करत आहेत.

व्हॉईस सर्चमुळे भारतभरात प्रवासाचा शोध घेणे अधिक सुलभ होत आहे

डेटामधील सर्वात महत्त्वाचा सुरुवातीचा संकेत म्‍हणजे, व्हॉईस सर्चमुळे वापरकर्ते आता ज्या भाषेत विचार करतात आणि बोलतात, त्याच भाषेत शोध घेऊ लागले आहेत. मजकूर शोधताना इंग्रजी भाषेला प्राधान्‍य दिले जात असले तरी व्हॉईस सर्चमध्ये भाषिक विविधता मोठ्या प्रमाणावर दिसून येते आणि इंग्रजी भाषेतील व्हॉईस क्वेरीजचे प्रमाण खूपच कमी आहे. या फरकामधून साधी बाब निदर्शनास येते की मातृभाषेत अधिक सोयीस्कर सुविधा पाहिजे असलेले वापरकर्ते आता व्हॉईस सर्चकडे वळत आहेत. उदाहरणार्थ, मल्याळम भाषेसाठी मजकूराच्या तुलनेत व्हॉईसचा वापर ४६:१ असा जास्‍त आहे, तमिळसाठी हे प्रमाण ३६:१ आणि तेलुगूसाठी ३२:१ आहे.

टाईप करणे अडथळा होता अशा वापरकर्त्‍यांसाठी हा बदल तंत्रज्ञानासह अभिव्‍यक्तीचा आहे. व्हॉईस सर्चमुळे वापरकर्त्‍यांना शब्दांची मर्यादा न ठेवता नेमके काय हवे आहे ते स्वतःच्या शब्दांत सांगता येते. सुरुवातीच्या निरीक्षणांनुसार, हिंदी आणि इंग्रजी एकत्र करून बोलणारे कोड-मिक्स्ड वापरकर्ते सर्वाधिक अभिव्यक्त असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या प्रत्येक क्वेरीमध्ये सरासरी १०.५ शब्द असतात. ‘मनाली में ३ नाईट्स के लिये हॉटेल चाहिये विथ माऊंटन व्ह्यू अँड ब्रेकफास्ट’ (मनालीमध्ये ३ रात्रींसाठी हॉटेल हवे आहे, ज्यात माऊंटन व्ह्यू (डोंगराचे दृश्य) आणि ब्रेकफास्ट (नाश्ता) दोन्ही असतील) यासारख्या सर्चमधून वापरकर्त्‍यांच्या आवडीनिवडीतील बारकावे दिसून येतात, जे टेक्स्ट सर्चमध्ये क्वचितच शक्य होते.

“मायराच्या माध्यमातून होत असलेली प्रगती अत्यंत उत्साहवर्धक आहे. स्वतःच्या मातृभाषेत अधिक सोयीस्कर असलेल्‍या वापरकर्त्‍यांना आता व्हॉईसच्या (आवाजाच्या) माध्यमातून प्रवासाचे नियोजन करण्याचा अधिक आपसूक मार्ग मिळू लागला आहे. कोची किंवा कोईम्बतूरमधील मल्याळम किंवा तमिळ भाषेत विचार करणाऱ्या व्‍यक्तींना इंग्रजीमध्ये टाइप करण्याऐवजी स्वतःच्या भाषेत आपल्या गरजा सांगता येणे, हा अनुभव पूर्णपणे बदलून टाकणारा आहे. ही सुरुवात असली तरी भारतामध्ये प्रवासाचे नियोजन अधिक सर्वसमावेशक आणि सुलभ करण्यासाठी व्हॉईसमध्ये मोठी क्षमता असल्याचे हे सुरुवातीचे संकेत आहेत,” असे मेकमायट्रिपचे सह-संस्‍थापक व ग्रुप सीईओ राजेश मागोव म्‍हणाले.

प्रीमियम प्रवासी आणि अनेक निर्बंध असलेल्‍या क्वेरीज

सुरुवातीच्‍या डेटामधून निदर्शनास येते की, प्रीमियम आणि एलिट (उच्‍चभ्रू) प्रवासी वर्ग मायरावर व्हॉईस सर्च करताना खूप मोठी वाक्ये वापरत आहेत. हे प्रवासी अनेकदा हॉटेलची श्रेणी, सोयीसुविधा, ग्रुपची संख्या आणि बजेट या सर्व गोष्टी एकाच बोललेल्या विनंतीमध्ये एकत्र करत आहेत. उदाहरणार्थ: ‘उत्तर गोव्यातील ५-स्टार व्हिला, ज्यामध्ये प्रायव्हेट पूल आहे, ६ बेडरूम्स आहेत आणि ८ प्रौढांसाठी प्रति रात्र ५० हजार रुपयांच्या आत पाहिजे’. अशा अत्यंत गुंतागुंतीच्या आणि बहु-निर्बंधांच्या क्वेरीज एकूण सर्चमध्ये कमी प्रमाणात असल्या, तरी व्हॉईस सर्च हा कीवर्ड-आधारित टेक्स्ट सर्चपेक्षा गुंतागुंतीचे प्रवासाचे हेतू टिपण्यासाठी किती अधिक सक्षम असू शकतो, याचे हे प्राथमिक संकेत आहे.

मेकमायट्रिप गेल्या अनेक वर्षांपासून एआय आणि मशीन लर्निंगमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे, प्रवासाच्या संपूर्ण चक्रात ही बुद्धिमत्ता समाविष्ट केली आहे. प्रवासाची प्रेरणा आणि शोध घेण्यापासून बुकिंग आणि विक्री-पश्चात सहाय्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर एआयचा वापर केला जात आहे. मायरा हे एआय-आधारित ट्रिप प्लॅनिंग असिस्टंट मोठ्या लँग्वेज आर्किटेक्चर आणि प्रवासाशी संबंधित सखोल डेटावर आधारित आहे. सध्या हे असिस्टंट बंगाली, हिंदी, कन्‍नड, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये दररोज ५०,००० हून अधिक संभाषणांना मदत करत आहे. विशेष म्हणजे, मायरावरील ४५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्वेरीज द्वितीय श्रेणीच्‍या आणि त्याहून लहान शहरां

तून येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments