Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedचाकण ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनचा पुढाकार ;...

चाकण ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनचा पुढाकार ; सीएसआरमधून मोठी मदत

पुणे : महा एनजीओ फेडरेशन यांच्या माध्यमातून आणि कार्डमॉम लॉजिस्टिक असेट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, जीर्ण झालेल्या पोस्टमार्टम कक्षाची पूर्णपणे पुनर्बांधणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील आरोग्य सेवांना मोठा बळ मिळणार आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कार्डमॉम लॉजिस्टिक्स असेट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक अजित पाटील, दुष्यंत डगावकर महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे, मुकुंद शिंदे, योगेश बजाज, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत रुग्णालयास अत्याधुनिक केमिकल कचरा व्यवस्थापन यंत्रणा, डिजिटल एक्स-रे मशीन, लसीकरणासाठी विशेष फ्रीज, चार गिझर, पाच स्कॅनर व प्रिंटर, चार अत्याधुनिक वजन काटे, दहा डिजिटल बीपी मशीन आणि दहा पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध करून देण्यात आले. तसेच, अत्यंत खराब अवस्थेतील पोस्टमार्टम कक्षाचे संपूर्ण नूतनीकरण करून तो सुसज्ज करण्यात आला आहे.

शेखर मुंदडा यांनी सीएसआरच्या माध्यमातून लोकाभिमुख आणि परिणामकारक प्रकल्प कशा प्रकारे राबविता येतात, यावर मार्गदर्शन केले. अजित पाटील यांनी सांगितले की, कंपनी सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य करत असून, आरोग्य क्षेत्रात आणखी कोणत्या सुविधा देता येतील यावरही कंपनीचा सकारात्मक विचार आहे.

उपक्रमाचे संयोजक आणि महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देणे हा आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवाजी चव्हाण, राहुल जगताप, अपूर्वा कारवा, कोमल गांधी यांनी समन्वय साधला. आदिवासी व ग्रामीण भागातील तसेच कामगार वर्गातून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments