Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य संघबंदी नंतर देशभर व देशाबाहेर विस्तारले. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य संघबंदी नंतर देशभर व देशाबाहेर विस्तारले. – लाखो सेवा प्रकल्प व संघ प्रेरित संस्था मोठ्या प्रमाणात कार्यरत —– योगेश थत्ते प्रदेश संयोजक

पुणे
(प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तत्कालिन केंद्र शासनाने लोकशाहीची तत्वे झुगारून बंदी आणली,लाखो स्वयंसेवकांना तुरुंगात विनाकारण डांबले परंतु त्या काळात व नंतर संघाचे काम विस्तारले गेले.नवनवीन सेवा प्रकल्प सुरू केले गेले.शाखांची संख्या वाढली,हजारो नवतरुण संघ कामात व सेवा प्रकल्पामध्ये जोडले गेले” असे प्रतिपादन इतिहास प्रबोधन समिती चे प्रदेश संयोजक योगेश थत्ते यांनी केले.
कर्वेनगर माहेश्वरी मंडळ आयोजित सकल हिंदू समाज तर्फे सहवास वस्तीमधील विराट हिंदू मेळाव्यात योगेश थत्ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले,संघ शताब्दी वर्ष साजरे करतांना संघाने हिंदू संघटन बरोबरच शाखा विस्तार तसेच समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विविध सामाजिक कार्यावर जास्त काम करायचे ठरवले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समिती द्वारा राज्यामध्ये समाजातील अनेक वंचित नागरिकांसाठी सेवा प्रकल्प चालवित आहे.संघाच्या विविध क्षेत्रात जसे विश्व हिंदू परिषद,विद्यार्थी परिषद,भारतीय मजदूर संघ,राष्ट्रीय सेविका समीर,वनवासी कल्याण आश्रम, विश्व विभाग,पूर्वांचल विकास,सामाजिक समरसता मंच ,गो-सेवा प्रकल्प,ग्रामविकास प्रकल्प,अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद,अधिवक्ता परिषद,भारत विकास परिषद,क्रीडा भारती,विद्या भारती,सेवा भारती,संस्कार भारती,उद्योजक भारती,संस्कृत भारती,सेवा सहयोग,भारत विकास परिषद,दिव्यांगासाठी काम करणारी सक्षम,सेवा आरोग्य फाऊंडेशन,स्वदेशी जागरण मंच,दुर्गा वाहिनी अशा विविध संस्था व संघटनाद्वारे अनेक क्षेत्रात कार्यरत असून या शताब्दी वर्षात अधिकाधिक सामाजिक कार्य करण्याचे ठरविले आहे”
मातृशक्ती वक्त्या व “विश्वमांगल्य छात्र सभा”च्या प्रा माधवी शिंदे पंचपरिवर्तंन द्वारे समाज सुदृढ,सुसंकृत व सुसंघटित व्हावा म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.कुटुंब प्रबोधन विषयाला अनुसरून त्यांनी कुटुंबियातील एकमेकांशी असलेला संवाद वाढायला हवा” असे प्रतिपादन करून पुढे म्हणाल्या देशाचे भवितव्य तरुण पिढीकडे असल्याने त्यांनी करिअर व पैसे कमविणे या पलीकडे जाऊन पितृऋण,मातृऋण,समाजऋण,
राष्ट्रप्रेम याकडे अधिक लक्ष देण्याची गरज
आहे.बदलत्या काळासोबत माणसाचे राहणीमान आणि विचारसरणी बदलली असली तरी कुटुंब ही संकल्पना आजही आपल्या जगण्याचा कणा आहे. कौटुंबिक नाते संबंध जपले पाहिजे.कुटुंबातील तरुण मुला मुलींना योग्य दिशा दाखवणे व त्यांना सुरक्षितता देणे हे घरातील ज्येष्ठांचे कर्तव्य असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले.कुटुंबातील लोकांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनात काय चालले आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करावा”
तुफान पर्जन्यवृष्टीमुळे सहवास वस्तीतील हे हिंदू संमेलन मनमोहन सोसायटीच्या मैदानाऐवजी सभागृहात घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस आकांक्षा देशपांडे ह्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.व कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.डॉ चेतन होशिंग यांनी “अफझलखानाचा वध” यावर अतिशय सुंदर पोवाडा सादर केला.
प्रा माधवी शिंदे यांचा सत्कार शुभांगी सुदामे यांनी तर योगेश थत्ते व डॉ चेतन होशिंग यांचा सत्कार मनमोहन सोसायटी चे अध्यक्ष संजीव महाजन यांनी केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीभाग सहकार्यवाह अमोल जोशी यांनी संस्थेचे अध्यक्ष संजीव महाजन यांचा सत्कार केला.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर संघचालक उदयन पाठक यांची मुख्य उपस्थिती होती.
विजय मोने यांनी पसायदान गायिले.
उत्कर्ष प्रकाशनचे उल्हास जोशी यांनी माधवी शिंदे यांना रवींद्र काळे अनुवादित “आधुनिक हिंदू धर्म का व कसा” हे पुस्तक भेट दिले.
उल्हास जोशी यांचा सत्कार योगेश थत्ते यांचे हस्ते करण्यात आला तर प्रा.माधवी शिंदे यांच्या हस्ते सूत्र संचालन करणाऱ्या आकांक्षा देशपांडे ह्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पद्मरेखा,मनमोहन सोसायटी,सहवास सोसायटी,भुजबळ परिसर,पाश्चिमा नगरी,रेवती, मेघराज,लक्ष्मीप्रसाद,आसावरी,विभावरी,विद्यापीठ सोसायटी,दामोदर अपार्टमेंट,आनंदनिकेतन,चिंतामणी,क्षिप्रा सोसायटी, के-५२,कृष्णाई कॉम्प्लेक्स,गीतगंगा,तसेच कर्वेनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments