पुणे, दि. ३ एप्रिल २०२६ : आगामी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यमान मतदार यादीतील नोंदींची पडताळणी २००२ च्या मतदार यादीशी करण्यात येत आहे. तसेच मतदारांच्या तपशीलांमध्ये (नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता इ.) आवश्यक दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दि. ०४ एप्रिल २०२६ व ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून संपर्क साधून आपले मॅपिंग व आवश्यक दुरुस्तीची कामे करून घ्यावीत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.


