Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedसागरी जीवन आणि समुद्राच्या निसर्गरम्य दृश्यांचे छायाचित्र व चित्रकला प्रदर्शन जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये...

सागरी जीवन आणि समुद्राच्या निसर्गरम्य दृश्यांचे छायाचित्र व चित्रकला प्रदर्शन जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सागरी क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्व – व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी

पुणे, ६ एप्रिल २०२६ : सागरी संघटना असलेल्या कंपनी ऑफ मास्टर मॅरिनर्स ऑफ इंडिया (सीएमएमआय), इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनियर्स इंडिया (आयएमईआय) आणि इंडियन मॅरिटाइम फाउंडेशन (आयएमएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच महा मॅरिनर्स असोसिएशन (एमएमए) आणि अमेझेंग नॉटिकल असोसिएशन (एएनए) यांच्या सहकार्याने कला रसिक आणि सागरी जीवनाची आवड असणाऱ्यांसाठी ५ ते ७ एप्रिल २०२६ दरम्यान पुण्यात एक वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत पाहता येईल. या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी एव्हीएसएम, कमांडंट एनडीए आणि शालिनी जग्गी यांच्या हस्ते झाले . या उपक्रमात सागरी क्षेत्राबाबत माहिती आणि या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थांसाठी करिअर बाबत मार्गदर्शनाचादेखील समावेश आहे .

‘होरायझन्स अँड सीस्केप्स’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात सुमारे १२५ कलाकृतींचा समावेश असून, त्यात चित्रे आणि छायाचित्रांचा समावेश आहे. या कलाकृतींमधून समुद्राचे विविध पैलू आणि समुद्रावर प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तींच्या अनुभवातून उमटलेल्या सागरी जीवनाची दुर्मिळ झलक पाहायला मिळत आहे. या उपक्रमाचा उद्देश सागरी संस्कृती, सर्जनशीलता आणि खलाश्यांच्या वैयक्तिक अनुभव लोकांपर्यंत पोहचविणे हा आहे. दरवर्षी ५ एप्रिल रोजी नॅशनल मेरीटाईम डे साजरा करण्यात येतो. याचे अवचित्त साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आला आहे

उद्घाटन समारंभास कॅप्टन मिलिंद फडणीस अध्यक्ष,सीएमएमआय पुणे शाखा,कॅप्टन किरण जोशी वॉर्डन , सीएमएमआय, कमोडोर अजय चिटणीस अध्यक्ष,आयएमएफ, गिरीश कोटवाल (अध्यक्ष,आयएमईआय ), कॅप्टन हर्षद पटवर्धन अध्यक्ष, एमएमए , संजीव ओगले अध्यक्ष, एएनए आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सागरी व्यावसायिकांच्या कलागुणांचे कौतुक करत प्रमुख पाहुणे व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी एव्हीएसएम, कमांडंट एनडीए म्हणाले की नॅशनल मेरीटाईम डे साजरा करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. हा दिवस म्हणजे सर्व सागरी व्यावसायिकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे; हे सागरी व्यावसायिक अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण परिस्थितीत जगभर समुद्रप्रवास करतात. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सागरी समुदायांपैकी एक देश आहे. आज जगभरातील एकूण खलाशांपैकी १० टक्के हे भारतीय आहेत. भारताची प्रगती ही महासागरांमध्ये आणि सागरी क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींशी थेट जोडलेली आहे. ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’मध्ये (स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ ) सध्या घडणाऱ्या घटनांवरून ही बाब स्पष्टपणे दिसून येते. या भागात मुक्त व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्याच्या मार्गांमध्ये व्यत्यय निर्माण झाला असून, जगभरातील सर्व राष्ट्रांसाठी एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. आपल्या नागरिकांना, भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी महासागरांचे आणि सागरी क्षेत्राचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्याची गरज आहे.

कार्यक्रमाचे प्रस्थाविक सीएमएमआय पुणे चे अध्यक्ष कॅप्टन मिलिंद फडणीस यांनी केले . ते म्हणाले की भारताचा व्यापार आणि वाणिज्य अखंडित ठेवण्यात सागरी व्यवसायिक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.त्यांचे बहुतांश कार्य जनसामान्यांच्या नजरेआड घडत असले, तरीही आपल्या राष्ट्राच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे .गेल्या अनेक दशकांमध्ये, भारताने जागतिक सागरी क्षेत्रात (शिपिंगमध्ये) आपले स्थान अधिक बळकट केले आहे; १९५९ मध्ये भारत हा ‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटने’ चा सदस्य बनला . या गौरवशाली वारशाचा सन्मान करतानाच, आपण अधिक सक्षम बंदरे, पर्यावरणपूरक सागरी वाहतूक (ग्रीनर शिपिंग), प्रगत जहाजबांधणी आणि जागतिक ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये (सागरी अर्थव्यवस्थेत) वाढती भूमिका या माध्यमातून भारताच्या उज्वल सागरी भविष्याकडेही पूर्ण आत्मविश्वासाने पाहत आहोत.

कॅप्टन किरण जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर एमएमए कॅप्टन हर्षद पटवर्धन यांनी आभार मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments