Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे भव्य आयोजन

दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, महानाट्यासह शाहिरी जलसा, गीत गायन, नृत्यकला, काव्य संमेलन, चर्चासत्र अशा विविध प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार होणार सहभागी

पिंपरी, दि. ७ एप्रिल २०२६ : महात्मा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी जयंती वर्ष तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ जयंतीच्या निमित्ताने शासन निर्देशाप्रमाणे सामाजिक समता सप्ताह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन ११ एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ याकाळात करण्यात आले आहे. पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भीमसृष्टी) येथे होणाऱ्या या विचार प्रबोधन पर्वांतर्गत महानाट्य, शाहिरी जलसा, गीत गायन, नृत्यकला, काव्य संमेलन, चर्चासत्र अशा विविध प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत ११ एप्रिल २०२६ रोजी प्रबोधन पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पर्वामध्ये ११ एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ असे पुढील ६ दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. १६ एप्रिल २०२६ रोजी महासूर्य या महानाट्याने प्रबोधन पर्वाचा समारोप होणार आहे.

महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करून समाजातील सर्व घटकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या या विचार प्रबोधन पर्वाचा उद्देश आहे. प्रबोधन पर्वात सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व, संविधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार-प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. याकाळात देश-विदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर वक्ते, अभ्यासक व कलावंत यांच्या सहभागातून नागरिकांना प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक अनुभव मिळणार आहे.

युवकांमध्ये सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव दृढ करण्यासाठी या पर्वामध्ये विशेष उपक्रम व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी या विचार प्रबोधन पर्वात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

…..

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वातील कार्यक्रमांचे वेळापत्रक –

पिंपरी येथील भीमसृष्टी येथे होणारे कार्यक्रम

पहिला दिवस – ११ एप्रिल २०२६

सकाळी १० वाजता : क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या मुख्य प्रशासकीय भवनातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सकाळी १०.१० वाजता : क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सकाळी १०.१५ वाजता : मी जोतीबाची सावित्री (एकपात्री नाट्यप्रयोग, सादरकर्त्या – शारदा मुंडे)

सकाळी ११.३० वाजता : शाहिरी जलसा (सादरकर्ते – शाहीर राजेंद्र कांबळे आणि सहकारी)

दुपारी १ वाजता : गीत गायनाची मैफिल (सादरकर्त्या – साधना मेश्राम आणि मंजुषा शिंदे)

दुपारी २.३० वाजता : तृतीय रत्न (महात्मा फुले लिखित नाटक, सादरकर्ते – थिएटर वर्कशॉप कंपनी)

सायंकाळी ४ वाजता : ‘गाथा साऊ जोतीची..’ (महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित कवितामय कार्यक्रम, सादरकर्ते – काव्यभूमी संस्था)

सायंकाळी ५.३० वाजता : परिसंवाद (विषय – महात्मा फुले यांना अभिप्रेत समाजव्यवस्था, सहभाग –विजय चोरमारे (ज्येष्ठ पत्रकार), ॲड. गोरक्ष लोखंडे (सदस्य, अनुसूचित जाती जमाती आयोग, महाराष्ट्र राज्य), प्रा. डॉ. वंदना महाजन (मुंबई विद्यापीठ), नुरखा पठाण (संविधान अभ्यासक), अॅड. दिशा वाडेकर (सर्वोच्च न्यायालय, दिल्ली) )

सायंकाळी ६.३० वाजता : विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन

सायंकाळी ७ वाजता : क्रांतिसूर्याला सलाम (प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम, सादरकर्ते – कव्वाल फैजान ताज)

रात्री ८.३० वाजता : जोतिबांची सावली…सावित्री माऊली… (तेजांकुर बहुउद्देशीय संस्था, अमरावती प्रस्तुत दोन अंकी ऐतिहासिक नाटक, सादरकर्ते – मा.अपूर्वा सोनार आणि सहकारी, अमरावती)

………………………………………………………….

दुसरा दिवस – १२ एप्रिल २०२६

सकाळी १० वाजता : स्थानिक कलावंतांचे गीत गायन (सादरकर्ते- प्रशांत मागाडे, गुंडूराज कांबळे, पंजाब कटके, गौतम मागाडे, सुधाकर धरड, जनार्दन खाडे, राजेंद्र वाकचौरे, गोविंद गाडे, दत्ता गायकवाड, प्रतिक सत्वधीर, अजित गायकवाड, निहाल लगाडे,किशोर रोकडे, स्वाती ढवळे, सविता पठ्ठेबहादुर, रोहिदास भडकवाड, कुसुम गायकवाड)

सकाळी ११.३० वाजता : प्रबुद्ध भीम भास्करा (प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम, सादरकर्ते – नितीन गायकवाड, भाग्यश्री इंगळे आणि सहकारी)

दुपारी १.०० वाजता : गीतगायन (सादरकर्ते – महेंद्र सावंग, रिता खंडारे)

दुपारी २.३० वाजता : गीत गायनाचा कार्यक्रम (सादरकर्ते- चेतन चोपडे आणि सहकारी, विशेष आकर्षण – मी होणार सुपरस्टार फेम बालगायिका अंजली गडपाले)

सायंकाळी ४ वाजता : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधावरील विचार आणि सद्यस्थिती तसेच परदेशातील शिक्षण व रोजगार संधी या विषयावर चर्चासत्र (सहभाग – प्रा. डॉ. विजय खरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), प्रा. डॉ. संजय खोब्रागडे (नागपूर), केशव वाघमारे (संशोधक), प्रा. डॉ. अशोक गायकवाड (प्राचार्य, कला वाणिज्य, बी. बी. ए महाविद्यालय, वडगाव मावळ), प्रा. डॉ. नितीश नवसागरे, नंदू मोरे (बेल्जियम), डॉ. शैलेश कोळेकर (डेन्मार्क), रेवा रॉय (कॅनडा), विरेंद्र घुटके (स्वीडन), सुदिप्ता धम्मचारी (इंग्लंड), प्रा. रोनके राम (पंजाब विद्यापीठ), प्रा. विवेक कुमार (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली) )

सायंकाळी ५.३० वाजता : गझलांचा कार्यक्रम (सादरकर्ते- गझलनवाज भीमराव पांचाळे)

सायंकाळी ७.०० वाजता : महामानवांना महासांगितीक अभिवादन – भीम उत्सव (सादरकर्ते – सुप्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे, अमोल यादव, सोमनाथ फटाके आणि सहकारी)

………………………………

तिसरा दिवस – १३ एप्रिल २०२६

सकाळी १० वाजता : गीत गायन (सादरकर्ते –कैलास शिंदे, संजना डोळस, नागेश नांदेडकर, शिवाजी कांबळे, सागर कांबळे, किशोर रणवीर, सुधाकर घरड, शिलाबाई साबळे, दादा वाघमारे, अजय धावारे, ताराबाई जोगदंड, गोरख काशिद, बाळ बनसोडे, राहुल उजगरे, अशोक गायसमुद्रे, नितीन कदम)

सकाळी ११.३० वाजता : लाईव्ह म्युझिकल ट्रीब्युट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सादरकर्ते – देवयानी आणि महिला कलाकार संच, मुंबई)

दुपारी १ वाजता : गीत गायन (सादरकर्ते – राहुल भोसले, शांताबाई फेम संजय लोंढे, हर्षद कांबळे )

दुपारी ३ वाजता : गीत गायन (सादरकर्ते – ॲड. रागिणी प्रतापसिंग बोदडे, देवराव अंभोरे)

सायंकाळी ५ वाजता : मराठी, उर्दू, हिंदी कवितांची मैफिल..काव्यशायराना (सहभाग – वसीम बरेलवी, प्रणय सतलज, संदीप जगताप, विशाल उशीरे)

सायंकाळी ६.३० वाजता : गीत गायन (सादरकर्ते – सिनेपार्श्वगायिका रेश्मा सोनवणे, सुप्रसिद्ध गायक संकल्प गोळे

आणि लिटल चॅम्प फेम सार्थक शिंदे)

रात्री ८ वाजता : ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ (महासंगीत रजनी, सादरकर्ते – सुप्रसिद्ध सिनेपार्श्वगायक आदर्श शिंदे आणि सिनेपार्श्वगायिका वैशाली सामंत)

…………………………..

चौथा दिवस – १४ एप्रिल २०२६

सकाळी ६ वाजता : महामानवांना संगीतमय अभिवादन – संतूर आणि सितार वादनाची जुगलबंदी (सादरकर्त्या- वहाने सिस्टर्स, उज्जैन, मध्यप्रदेश)

सकाळी ८ वाजता : युगपुरूष (गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम, सादरकर्ते – सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक नागसेन सावदेकर आणि कुणाल वराळे )

सकाळी ९ वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन (हस्ते – महापौर रवि लांडगे, स्थळ – मनपा भवन)

सकाळी ९.१५ वाजता : क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सकाळी ९.३० वाजता : वंदना व समता सैनिक दलाची मानवंदना (संयोजन – भारतीय बौद्ध महासभा)

सकाळी ९.३० वाजता : नृत्य कला फ्लॅश मॉब (सादरकर्ते – दिया बनसोडे आणि सहकारी )

सकाळी ९.३० वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी एच.ए.कॉलनी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सकाळी ९.४५ वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दापोडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सकाळी १० वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी (आयोजक – एकता कर्मचारी संघटना)

सकाळी १०.३० वाजता : तारपावादक पद्मश्री भिकल्या धिंडा आणि सहकारी यांच्या वतीने महामानवांना आदिवासी कलाविष्कारातून अभिवादन (सादरकर्ते – तारपा आदिवासी नृत्य पथक, वाळवंडा, ता. जव्हार, जि. पालघर)

सकाळी ११ वाजता : सांस्कृतिक शाहिरी जलशाचा कार्यक्रम शाहिरी भीमगर्जना (सादरकर्ते – युवा शाहीर गंधर्व पृथ्वीराज देवानंद माळी सांगलीकर आणि सहकारी)

दुपारी १२.३० वाजता : आंबेडकरी चळवळीतील गायकांचा जीवनपट साकारणारा संगीतमय कार्यक्रम (सादरकर्ते – सुप्रसिद्ध गायक संदेश विठ्ठल उमप, प्रविण डोणे, कडूबाई खरात, अमोल घोडके, ओमकार घाडगे आणि सहकारी)

दुपारी २ वाजता : गीत गायन (सादरकर्ते –चंद्रकांत शिंदे, गायत्री शेलार, राधा खुडे, चित्रसेन भवार)

दुपारी ४ वाजता : प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम (सादरकर्ते – प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक डॉ. रामपाल धारकर, अमरावती)

सायंकाळी ५.३० वाजता : गीत गायन (सादरकर्ते -अजय देहाडे आणि सारेगमप फेम विनोद गोडबोले)

सायंकाळी ७.३० वाजता : ट्रीब्युट टू महात्मा फुले ऍन्ड डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स (महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नृत्य संगीतातून अनोखे अभिवादन, सादरकर्ते – राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. सय्यद पाशा आणि भारतातील नामवंत दिव्यांग कलाकार)

रात्री ९.३० वाजता : फोक स्वर साधना (लोककलेवर आधारित ४० कलाकारांनी सजलेला पारंपरिक वाद्यवृंदाचा संगीतमय अविष्कार, सादरकर्ते – शेखर नवतरे आणि सहकारी)

……………………

पाचवा दिवस – १५ एप्रिल २०२६

सकाळी १० वाजता : गीत गायन (सादरकर्ते – स्थानिक कलावंत बापू माने, मोहम्मद रफी शेख, माणिक निसर्गंध, जयराम लांडगे, संदीपान इंगळे, जनार्दन खाडे, दामु चंदनशिवे, भगवान आढाव, संजय कांबळे, सुजाता कांबळे, धम्मसागर कांबळे, दिलीप कोलते)

सकाळी ११.३० वाजता : महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

सकाळी ११.४५ वाजता : गीतगायन (सादरकर्ते – अनिरूद्ध सुर्यवंशी, सागर येल्लाळे, सुनिल गायकवाड, मारूती जकाते, वैशाली नगराळे, भारत लोणारे, सुमेध कल्हाळीकर)

दुपारी १२.३० वाजता : जोती साऊंच्या कवितांचा नाट्यमय आविष्कार (सादरकर्त्या – संघर्षा उषा कांबळे)

दुपारी १ वाजता : गीत गायन (सादरकर्ते –मुन्ना भालेराव, निलेश कसबे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. निकीता गायकवाड)

दुपारी २.३० वाजता : नृत्याविष्कारासह गीत गायन (सादरकर्ते – अनिल गायकवाड, निशांत गायकवाड, स्वप्निल पवार, दिक्षा वाव्हळ, आकाश गायकवाड आणि सहकारी)

दुपारी ४ वाजता : गीत गायन (सादरकर्ते – विशाल ओव्हाळ, धीरज वानखेडे, शेखर गायकवाड, संतोष कांबळे)

सायंकाळी ५.३० वाजता : गीत गायन (सादरकर्ते – प्रज्ञा इंगळे, गझल गायक अशोक गायकवाड, भगवान शिरसाठ)

सायंकाळी ७ वाजता : गीत गायन (सादरकर्ते – पल्लवी ढोले – पत्की)

रात्री ८.३० वाजता : राहुल जोंधळे दिग्दर्शित… आंबेडकरी चळवळीवर आधारित नाटक – निळी टोपी (सादरकर्ते – आंबेडकरवादी मंच नांदेड)

……………..

एच.ए.मैदान पिंपरी येथे होणारे कार्यक्रम

सहावा दिवस – १६ एप्रिल २०२६

सायंकाळी ६ वाजता : सम्यक थिएटर, नागपूर प्रस्तुत महानाट्य महासूर्य (सादरकर्ते – नरेश साखरे, सम्यक थिएटर, नागपूर)

…………

दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्वीशताब्दी जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक समता सप्ताहानिमित्त महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

वेळ – दि. ११ ते १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत

स्थळ – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी – १८

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments