Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमहापौर करंडक ट्रॅकनाईटस राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धा पुण्यात रंगणार 24 ते...

उपमहापौर करंडक ट्रॅकनाईटस राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धा पुण्यात रंगणार 24 ते 26 एप्रिल दरम्यान पुण्यात प्रथमच प्रकाशझोतात आयोजन

पुणे, 8 एप्रिल 2026: उपमहापौर करंडक ट्रॅकनाईटस राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन येत्या 24 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान पुण्यात करण्यात आले असून प्रकाशझोतात होणारी ही पहिलीच मैदानी स्पर्धा ठरणार आहे. ॲथलेटिक
स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने व पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

मुंबई येथे 2020 आणि 2025 यावर्षी तर नाशिक येथे 2023 व 2024 अशा दोन वर्षी प्रकाश झोतातील स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर ट्रॅकनाईट्स यांनी हा चित्त थरारक अनुभव पुणे करांसाठी यावर्षी आणला असून राज्य मैदानी अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यातील क्रीडाप्रेमींना अनुभव घेता येणार आहे.

माजी राष्ट्रीय पदक विजेते महाराष्ट्राचे ऍथलेट आणि राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय शिबिरात सहभागी झालेले एथिलिट चिराग पटेल हे या स्पर्धेचे संयोजन सचिव असून त्यांच्याच नेतृत्वाखाली ट्रॅकनाईट्स यांनी पारंपारिक मैदानी स्पर्धेचे हे नवे स्वरूप व्यावसायिक व प्रेक्षकांना आवडेल, असा अनुभव देण्यासाठी तयार केले आहे.

एकूण तीन दिवस चालणारी ही स्पर्धा ॲथलेटिक्स विविध गटांमध्ये आणि एकूण 90 ट्रॅक अँड फिल्ड प्रकारांमध्ये पार पडणार असून 8 वर्षाखालील मुले व मुली पासून खुल्या गटापर्यंत सर्व वयोगटांमधील स्पर्धक या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. वैयक्तिक व सांघिक अजिंक्यपद पणाला लागणार असलेल्या या स्पर्धेत एकूण 50 हजार रुपये पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सादरीकरण व आयोजन यामुळे ट्रॅकनाईट्स यांनी प्रकाशझोतातील स्पर्धा इलेक्ट्रॉनिक टाइमिंग सिस्टीम याबरोबरच प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी एलइडी डिस्प्ले बोर्डस ठेवले असून त्यामुळे उच्च दर्जाच्या या स्पर्धेला आगळी झळाळी प्राप्त होणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना संयोजन सचिव चिराग पटेल म्हणाले की, युवा ॲथलिटना आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्पर्धात्मकतेचा अनुभव राज्यस्तरीय स्पर्धांच्या व्यासपीठापासूनच देण्यासाठीचा ट्रॅकनाईटसचा प्रयत्न आहे. प्रकाश झोतात होणारी स्पर्धा व्यावसायिक दर्जाचे इलेक्ट्रॉनिक टाइमिंग बोर्ड आणि संपूर्ण सादरीकरण यामुळे खेळाडूंची कामगिरी आणि आत्मविश्वास उंचावणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीतील हा एक संस्मरणीय अनुभव ठरावा अशी आमची संयोजक म्हणून इच्छा आहे.

सर्व सहभागी खेळाडूंना राज्यस्तरापासूनच आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धांचा दर्जात्मक अनुभव मिळावा हा या स्पर्धेचा उद्देश असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये गुणवान ॲथलिट सहभागी होत असल्यामुळे उच्च दर्जाची स्पर्धा पाहावयास मिळेल अशी अशी आमची खात्री आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा संयोजनाच्या क्षितिजावर संपूर्ण चित्र पालटून टाकणारा नवा अनुभव देण्यासाठी आणि एकंदरीतच संयोजनाचा दर्जा उंचावण्यासाठी ट्रॅकनाईट्स यांनी कंबर कसली असून तळागाळापासूनच सर्व खेळाडूंना उच्च दर्जाचा स्पर्धात्मक अनुभव देणे आणि त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावणे हेच या स्पर्धेचे अंतिम लक्ष आहे असे त्यांनी नमूद केले.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क ॲथलेटिक्स स्पोर्टस फाउंडेशन +91 98670 08823 अथवा https://tmssports.in/tracknights/pune/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments