Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रारव पँथर्स-सारडा स्टॅलियन लढत बरोबरीत पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत...

प्रारव पँथर्स-सारडा स्टॅलियन लढत बरोबरीत पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या चेंडूपर्यंत थरार

पुणे : पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग (बेहडे पीएमपीएल) क्रिकेट स्पर्धेत बुधवारी अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेली प्रारव पँथर्स आणि सारडा स्टॅलियन यांच्यातील लढत बरोबरीत सुटली.

नेहरू स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. प्रारव पँथर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १२ षटकांत ७ बाद १०२ धावा केल्या. मधल्या फळीतील अंकित बजाजने १७ चेंडूंत तीन षटकारांसह नाबाद ३१ धावा करून पँथर्स संघाला शंभर धावांचा टप्पा ओलांडून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना मुकुल जाजू आणि मधुसुदन कलंत्रीने सारडा स्टॅलियन संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. मात्र, ही जोडी फुटली आणि धावगतीला ब्रेक लागला. अखेरच्या सात चेंडूंत बारा धावांची गरज असताना सारडा स्टॅलियन संघाने विजय दृष्टिपथास आणला होता. मात्र, अखेरच्या चेंडूवर यश लढ्ढा धावबाद झाला आणि लढत टाय झाली. सारडा स्टॅलियन संघाने ४ बाद १०२ धावा केल्या.

यानंतर दुसऱ्या लढतीत हाय-बाइट चॅलेंजर्स संघाने मोल्डर्स संघावर २५ धावांनी मात केली. चॅलेंजर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १३५ धावा केल्या. मोल्डर्स संघाला ७ बाद ११० धावाच करता आल्या. तिसऱ्या लढतीत मास्टर स्मॅशर्स संघाने स्मॅशर योद्धाज संघावर तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक : प्रारव पँथर्स – १२ षटकांत ७ बाद १०२ (अंकित बजाज नाबाद ३१, धीरज मंत्री २०, हर्ष दरक २०, नितीश मणीयार १८, सागर कारवा ३-०-१९-२, अमित राठी ३-०-१९-२) बरोबरी वि. सारडा स्टॅलियन – १२ षटकांत ४ बाद १०२ (मुकुल जाजू २१, मधुसुदन कलंत्री ३५, रोहित राठी १२, यश लढ्ढा १२, अंकित बजाज २-०-२४-१, गोविंद राठी ३-०-१५-१, नितीश मनियार १-०-११-१).

हाय-बाइट चॅलेंजर्स – १२ षटकांत ४ बाद १३५ (सर्वेश भट्टड ४१, सूरज लाहोटी नाबाद ३३, हृषीकेश झंवर नाबाद २२, नीलेश राठी ३-०-३५-१, संदीप काब्रा २-०-१३-१) वि. वि. मोल्डर्स – १२ षटकांत ७ बाद ११० (सुमीत मुंद्रा नाबाद ४२, नीलेश राठी २६, आयुष काब्रा २-०-२६-२, सुदर्शन हरकुट २-०-१४-२).

मास्टर स्मॅशर – १२ षटकांत ३ बाद १०० (प्रथमेश मालपाणी ३६, केदार बजाज नाबाद ३३, आकाश काब्रा ३-०-२०-१, कपिल जाजू १-०-१०-१) वि. वि. स्मॅशर योद्धाज – १२ षटकांत ४ बाद ९७ (कोशिष धूत ३७, वरुण भुतडा २४, अभय जाजू नाबाद १९, अमर झवर २-०-२४-२, केदार बजाज ३-०-१०-१).

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments