Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized45 वर्षांपासून विश्वासार्ह. पिढ्यांसाठी तयार केलेले

45 वर्षांपासून विश्वासार्ह. पिढ्यांसाठी तयार केलेले

स्वर्गीय श्री. प्रल्हाद पी. छाब्रिया यांनी 1981 मध्ये स्थापन केलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या गौरवशाली प्रवासाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्जची भारतातील पहिली आणि एकमेव बॅकवर्ड-इंटिग्रेटेड उत्पादक म्हणून आज ही कंपनी ओळखली जाते.

पीव्हीसी रेझिनची मागणी आणि पुरवठा यांमधील वाढती तफावत ओळखून, श्री. छाब्रिया यांनी दूरदृष्टीने 1994 मध्ये बॅकवर्ड इंटिग्रेशन पीव्हीसी रेझिन प्लांट आणि भारतातील अशा प्रकारची पहिली ओपन-सी क्रायोजेनिक जेट्टी कार्यान्वित केली. यामुळे रेझिनपासून ते तयार उत्पादनांपर्यंत एका संपूर्ण सर्वसमावेशक उत्पादन प्रणालीचा पाया घातला गेला, ज्यामुळे उत्कृष्ट गुणवत्ता निश्चित झाली आणि एक मजबूत, शाश्वत स्पर्धात्मक फायदा झाला, जो आजही कंपनीच्या मजबूत स्थानाचा आधार आहे.

या भक्कम पायावर उभारलेल्या, ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ची आजची उलाढाल ₹4,000 कोटींहून अधिक आहे. विशालता, लवचिकता आणि गुणवत्तेवर असलेला कंपनीचा सातत्यपूर्ण भर अधोरेखित करते. गेल्या साडेचार दशकांमध्ये, या कंपनीने भारतातील पीव्हीसी (PVC) पाईप्स आणि फिटिंग्जच्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक म्हणून आपली वाटचाल केली आहे. कंपनीची स्थापित उत्पादन क्षमता वर्षाला सुमारे पाच लाख मेट्रिक टन इतकी आहे आणि तिचे वितरण जाळे अत्यंत व्यापक आहे—ज्यामध्ये 700 हून अधिक विशेष वितरक आणि 35,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांचा समावेश आहे. याच बळावर कंपनीने संपूर्ण भारतभर आपले भक्कम अस्तित्व निर्माण केले आहे. फिनोलेक्सची सुरुवातीची वाढ ही भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेशी जवळून जोडलेली होती—आणि कंपनी आजही शेतकरी समुदायाची मनापासून ऋणी आहे, कारण त्यांच्याच विश्वासाने कंपनीच्या या प्रवासाचा पाया रचला होता—तरीही आज कंपनीच्या उत्पादनांची श्रेणी कृषी क्षेत्रासोबतच प्लंबिंग आणि स्वच्छता क्षेत्रापर्यंत विस्तारली आहे. हे विस्तारलेले स्वरूप कंपनीचे एका बहुआयामी आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या संस्थेमध्ये झालेले उत्क्रांती-रूपांतर स्पष्टपणे दर्शवते.

या महत्त्वपूर्ण टप्प्याविषयी कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रकाश पी. छाब्रिया म्हणाले:

“गेल्या अनेक वर्षात, आम्ही उद्योगातील विविध चढ-उतारांचा सामना केला आहे; आणि या प्रत्येक अनुभवाने शिस्त तसेच मूलभूत तत्त्वांवरील आमचा विश्वास अधिक दृढ केला आहे. आमचा दृष्टिकोन नेहमीच दीर्घकालीन उभारणीचा राहिला आहे, ज्याचा पाया गुणवत्ता आणि विश्वासावर रचलेला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर, मी आमच्या ‘फिनोलेक्स परिवारा’चे, विक्रेत्यांचे, पुरवठादारांचे, ग्राहकांचे, संस्थात्मक भागधारकांचे, बँकिंग भागीदारांचे, समभागधारकांचे, संचालक मंडळाचे, धोरणकर्त्यांचे आणि सरकारी संस्थांचे मनःपूर्वक आभार मानतो—आमच्या या प्रवासाला आकार देण्यात या सर्वांनीच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

व्यवस्थापकीय संचालक श्री. उदीप्त अग्रवाल यांनी पुढे सांगितले:

“व्यापक आर्थिक आणि वस्तूंच्या चक्रांशी जवळून जोडलेल्या या क्षेत्रात, लवचिक आणि संयमित राहणे हीच आमची प्राथमिकता आहे. वाढीबाबत शिस्तबद्ध दृष्टिकोन कायम राखत असतानाच, बाजारातील घडामोडींशी सुसंगत असे आमचे निर्णय घेणे आम्ही सुरूच ठेवू.”

केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता, फिनोलेक्स सुरुवातीपासूनच समाजात अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिला आहे. भारतात ‘कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी’ ही कायदेशीर आवश्यकता बनण्यापूर्वीच, या कंपनीने समुदाय विकासात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती; शिक्षणाची आणि आरोग्यसेवेची उपलब्धता हे मूलभूत मानवाधिकार आहेत, हा संस्थापकांचा दृढ विश्वास यासाठी त्यांना मार्गदशक ठरला. हीच दूरदृष्टी पुढे नेत, ‘मुकुल माधव फाउंडेशन’—जे 2014 पासून फिनोलेक्सचे CSR भागीदार आहे—भारत सरकारने निश्चित केलेल्या 16 प्रमुख क्षेत्रांपैकी 15 क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. तसेच, हे फाउंडेशन संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या सर्व 17 उद्दिष्टांमध्ये योगदान देत असून, त्याचा देशभरातील विविध समुदायांवर सकारात्मक प्रभाव पडतो आहे.

“प्रवर्तक कुटुंबाच्या पुढील पिढीचे, ज्यांचे नेतृत्व श्रीमती गायत्री प्रकाश छाब्रिया करत आहेत, हा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत; यात जागतिक दर्जाची उत्पादने पुरवणे, भारताची पायाभूत सुविधा बळकट करणे आणि शाश्वत तसेच सामाजिक विकासासाठी भागीदारी करणे यांचा समावेश आहे. एकत्रितपणे, 45 वर्षांच्या विश्वासावर आधारित ही वाटचाल आम्ही भावी पिढ्यांसाठीही अविरतपणे पुढे नेत राहू.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments