Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुमित एसएसजीने महाराष्ट्राच्या एम.ई.एम.एस. १०८ प्रकल्पाकरिता प्रगत रुग्णवाहिका ताफा उपलब्‍ध करून देण्‍याकरिता...

सुमित एसएसजीने महाराष्ट्राच्या एम.ई.एम.एस. १०८ प्रकल्पाकरिता प्रगत रुग्णवाहिका ताफा उपलब्‍ध करून देण्‍याकरिता पिनाकल इंडस्ट्रीजसोबत सहयोग केला

महाराष्ट्रासाठी २५५ ए.एल.एस., १२७४ बी.एल.एस. आणि ३६ निओनेटल रुग्णवाहिकांचे बॉडी किट्स पिनाकल इंडस्ट्रीजकडून विकसित केले जाणार

पुणे, महाराष्ट्र ७ एप्रिल २०२६: महाराष्ट्रातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि प्रतिसाद सुविधा प्रबळ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सुमित एसएसजीने रुग्णवाहिका आणि विशेष वाहनांचे रूपांतर करणाऱ्या भारतातील आघाडीच्या पिनाकल इंडस्ट्रीजसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगांतर्गत राज्यातील सर्वात महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य उपक्रम महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एम.ई.एम.एस. १०८) प्रकल्पासाठी उच्‍च दर्जाच्या अॅडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट (ए.एल.एस), बेसिक लाईफ सपोर्ट (बी.एल.एस) आणि निओनेटल (नवजात अर्भकांसाठी) रुग्णवाहिकांची रचना व पुरवठा केला जाईल.

सुमित एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस हा सुमित ग्रुप, बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि एसएसजी ट्रान्सपोर्ट सॅनिटारियो (स्‍पेन) यांचा संयुक्त उद्यम आहे. हा उद्यम १० वर्षांची सार्वजनिक खाजगी भागीदारी – डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, ट्रान्सफर (पीपीपी-डीबीएफओटी) मॉडेल अंतर्गत १,७५६ आपत्कालीन वाहनांचा ताफा तैनात व ऑपरेट करेल. प्रगत तंत्रज्ञान, प्रशिक्षित कर्मचारी आणि एकात्मिक आपत्कालीन यंत्रणेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीची काळजी सुधारणे, जलद आपत्कालीन प्रतिसाद सुनिश्चित करणे आणि महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सेवांचा विस्तार करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

हा रुग्णवाहिका ताफा महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सुमित एसएसजीचे अध्यक्ष श्री. सुमित साळुंके म्हणाले, “रुग्णवाहिका निर्मितीच्या क्षेत्रात पिनाकल इंडस्ट्रीजला खूप अनुभव आहे आणि एम.ई.एम.एस. १०८ प्रकल्पाच्या यशासाठी त्‍यांचा सहयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचा रुग्णवाहिका ताफा मजबूत, विश्वासार्ह, सुरक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. पिनाकलची सिद्ध झालेली अभियांत्रिकी क्षमता खात्री देते की, आम्ही तैनात केलेली प्रत्येक रुग्णवाहिका जागतिक दर्जाच्या आपत्कालीन प्रतिसादासाठी आवश्यक असलेल्या मानकांची पूर्तता करेल.”

“आम्‍हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरील आणि महत्त्वाच्या प्रकल्पासाठी सुमित एसएसजीसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटत आहे. पिनाकल इंडस्ट्रीजमध्ये आम्‍ही नेहमी उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि रुग्ण-केंद्रित डिझाइनवर लक्ष केंद्रित करतो या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा आपत्कालीन प्रतिसाद क्षमता सुधारण्‍याचा, तसेच जीव वाचवण्याच्या कार्यात मोलाचे योगदान देण्‍याचा मनसुबा आहे,” असे पिनाकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. सचिन देशमुख म्‍हणाले.

या सहयोगाचा भाग म्हणून, पिनाकल इंडस्ट्रीज या प्रकल्पांतर्गत रुग्णवाहिकांची रचना आणि पुरवठा करेल, तसेच ‘सुरुवातीपासून शेवटपर्यंत रुग्णवाहिका रूपांतरण भागीदार म्हणून काम करेल. कंपनी शहरी आणि दुर्गम भागांसाठी जलद प्रतिसाद, वैद्यकीय कार्यक्षमता आणि रुग्ण सुरक्षितता लक्षात घेऊन तयार केलेल्‍या संपूर्ण वैद्यकीय परिवहन सोयीसुविधा उपलब्ध करून देईल.

प्रत्येक रुग्णवाहिकेमध्ये वैद्यकीय-दर्जाचे इंटिरिअर्स, मॉड्युलर स्टोरेज सिस्टम, रुग्णांच्या आरामासाठी प्रगत सुविधा आणि अपघातात सुरक्षित असणारी रचना असेल; ज्यामुळे भारतीय व जागतिक आरोग्यसेवा गतिशीलता मानकांचे पालन होण्‍याची खात्री मिळेल.

या सहयोगांतर्गत, पिनाकल इंडस्ट्रीज खालील सुविधा पुरवेल:

· ए.एल.एस., बी.एल.एस. आणि निओनेटल या रुग्णवाहिकांच्या विविध प्रकारांचे रूपांतरण.

· स्वच्छतेसाठी उत्तम आणि निर्जंतुकीकरण करण्यास सोपे वैद्यकीय-दर्जाचे पॅनेलिंग व इंटिरिअर्स.

· ई.एम.टी. आणि पॅरामेडिक्ससाठी आरामदायी व कार्यक्षम आसन व्यवस्था.

· एकात्मिक ऑक्सिजन यंत्रणा, सक्शन युनिट्स आणि आपत्कालीन वैद्यकीय उपकरणांची मांडणी.

· एल.ई.डी. लाइटिंग आणि कंट्रोल पॅनेलसह प्रगत इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर.

· स्पेंसर इटालिया उपकरणांशी सुसंगत असलेल्‍या स्ट्रेचर माउंटिंग सिस्टम्‍स.

· ए.आय.एस – १२५ मानकांचे पूर्णतः पालन.

एम.ई.एम.एस. १०८ प्रकल्पावरील प्रभाव

· उच्‍च टिकाऊपणा आणि वैद्यकीय सुरक्षा मानकांनुसार तयार केलेल्या रुग्णवाहिका.

· रुग्ण आणि ई.एम.एस. कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आराम आणि सुरक्षा.

· संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्यदायी आणि सहज स्वच्छ करता येण्यासारखे पृष्ठभाग.

· महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीसाठी सुसंगत अशी मजबूत रचना

· जागतिक स्तरावरील वैद्यकीय उपकरणांशी विनासायास एकत्रीकरण.

हा सहयोग भारतात सर्वात प्रगत आणि विस्तारक्षम आपत्कालीन वैद्यकीय सेवा ताफा डिझाइन करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामध्ये स्वदेशी अभियांत्रिकीमधील उत्कृष्टता आणि जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचे संयोजन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments