Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedझूम ने भारतात झूम कॉन्टॅक्ट सेंटर सेवांच्या सुविधा वाढवल्या; आता देशातच स्थानिक...

झूम ने भारतात झूम कॉन्टॅक्ट सेंटर सेवांच्या सुविधा वाढवल्या; आता देशातच स्थानिक फोन नंबर उपलब्ध

आता सहा टेलिकॉम सर्कलमध्ये सेवा सुरू; क्लाऊडवर आधारित एआय तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना अधिक सहज आणि स्मार्ट अनुभव मिळणार
पुणे, 9 एप्रिल – झूम कम्युनिकेशन्स, इंक. (NASDAQ:ZM) यांनी आज जाहीर केले की भारतात झूम कॉन्टॅक्ट सेंटर साठी स्थानिक (नॅटिव्ह) फोन नंबरची सुविधा सुरू झाली आहे. ही सेवा महाराष्ट्र, तमिळनाडू (चेन्नई), मुंबई, दिल्ली NCR, कर्नाटक (बेंगळुरू) आणि आंध्र प्रदेश व तेलंगणा (हैदराबाद) या सहा टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. या सुविधेमुळे भारतातील कंपन्यांना ग्राहकांशी संपर्क साधणे अधिक सोपे होणार असून, नियमांनुसार आणि एआयच्या मदतीने उत्तम सेवा अनुभव देता येणार आहे.
ही सेवा झूम इंडिया मार्फत दिली जाते. त्यांच्याकडे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचा (DoT) संपूर्ण भारतासाठी परवाना आहे. आता स्थानिक भारतातील नंबर उपलब्ध झाल्यामुळे कंपन्या त्यांच्या एजंट्स आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने क्लाऊड-आधारित कॉन्टॅक्ट सेंटर सेवा सहजपणे चालवू शकतात आणि स्थानिक नियमांचे पालन करू शकतात. झूम कॉन्टॅक्ट सेंटर हे एक कनेक्टेड प्लॅटफॉर्म आहे, जिथे व्हॉईस कॉल, व्हिडिओ, चॅट आणि इतर डिजिटल सेवा एकत्र मिळतात. यामध्ये प्रगत एआय फीचर्स असल्यामुळे एजंट्सना मदत मिळते आणि अनेक ग्राहकांशी संवाद अधिक जलद व अचूक पद्धतीने पूर्ण होतात. त्यामुळे ग्राहकांचा अनुभव सुधारतो आणि कामकाज अधिक कार्यक्षम बनते.
वेलचामी शंकरलिंगम, अध्यक्ष (प्रॉडक्ट आणि इंजिनिअरिंग), झूम यांनी सांगितले, “ग्राहक सेवा क्षेत्रात मोठा बदल होत आहे. आता फक्त ग्राहकांशी बोलणे नाही, तर त्यांच्या समस्यांचे पूर्ण समाधान देण्यावर जास्त भर दिला जात आहे, ज्याला आम्ही ‘रिझोल्यूशन इकॉनॉमी’ म्हणतो. झूम कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये मध्ये एआय तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे ग्राहकाचा प्रवास सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट हाताळली जाते आणि त्याला योग्य समाधान मिळते. भारतात स्थानिक फोन नंबर सुरू केल्यामुळे कंपन्यांना अधिक स्मार्ट आणि वैयक्तिक ग्राहक सेवा देता येईल, ज्यामुळे समस्यांचे निराकरण जलद होईल आणि ग्राहकांशी नातेसंबंध मजबूत होतील. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारासाठी हे खूप महत्त्वाचे आहे, कारण येथे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांना जलद वाढीसोबतच चांगली सेवा आणि नियमांचे पालन राखणे गरजेचे असते.”
समीर राजे, जनरल मॅनेजर आणि भारत व सार्क विभाग प्रमुख, झूम म्हणाले, “भारत हा झूम साठी अत्यंत महत्त्वाचा आणि वेगाने वाढणारा बाजार आहे. त्यामुळे आम्ही स्थानिक गरजांनुसार नवीन सुविधा विकसित करून कंपन्यांना अधिक प्रभावीपणे स्पर्धा करण्यास आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यास मदत करत आहोत. भारतातील अनेक कंपन्या त्यांच्या ग्राहक सेवा पद्धतीमध्ये बदल करत आहेत आणि फक्त संवाद न ठेवता समस्या सोडवण्यावर जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे तुकड्या तुकड्यांमध्ये सेवा देण्याऐवजी एकसंध आणि परिणामकारक अनुभव देणे आता गरजेचे झाले आहे. झूम कॉन्टॅक्ट सेंटरसाठी भारतातील स्थानिक नंबरमुळे कंपन्यांना क्लाउड सेवांचा वापर करून पूर्णपणे कनेक्टेड आणि स्मार्ट ग्राहक अनुभव देता येईल. तसेच, टीम्सना भारतातील कुठूनही ग्राहकांना सेवा देण्याची अधिक लवचिकता मिळेल.”
झूम कॉन्टॅक्ट सेंटर भारतातील झूम डेटा सेंटर्सचा वापर करून सेवा देते, त्यामुळे ग्राहकांना स्थानिक नियमांचे पालन करणे सोपे होते. स्थानिक (नॅटिव्ह) नंबर पब्लिक स्विच्ड टेलिफोन नेटवर्क (PSTN) वर चालतात, त्यामुळे ग्राहक भारतभर कुठूनही कॉल करू शकतात आणि कॉल स्वीकारू शकतात. झूम कॉन्टॅक्ट सेंटरसाठी भारतातील स्थानिक नंबर उपलब्ध झाल्यामुळे कंपन्यांना अधिक लवचिकता मिळते. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कॉल्स सहजपणे हाताळता येतात, तसेच एकाच प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या टीम्स (हायब्रीड मॉडेल) द्वारे ग्राहक सेवा देणे सोपे होते.
कृष्णा बैद्य, सीनियर इंडस्ट्री डायरेक्टर, फ्रॉस्ट अँड सुलिव्हन म्हणाले, “भारताचा कॉन्टॅक्ट सेंटर बाजार सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आता नियमांचे पालन आणि एआय-आधारित सेवा दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. झूमने भारतात स्थानिक फोन नंबर सुरू केल्यामुळे आणि संपूर्ण भारतासाठी परवाना व स्थानिक डेटा सेंटर्स असल्यामुळे कंपन्यांसाठी क्लाऊड सेवा वापरणे अधिक सोपे झाले आहे. त्याचबरोबर एआय क्षमतांमुळे झूम कॉन्टॅक्ट सेंटर भविष्यात ग्राहक सेवेमध्ये मोठा बदल घडवू शकते.”
झूम कॉन्टॅक्ट सेंटर विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, कृपया झूम कॉन्टॅक्ट सेंटर पेजला भेट द्या.
झूम बद्दल
झूम कम्युनिकेशन्स, इंक. (NASDAQ: ZM) हे आधुनिक कामकाजासाठी एक प्रभावी प्लॅटफॉर्म आहे, जे थेट सहकार्याला प्रत्यक्ष परिणामांमध्ये बदलण्यास मदत करते. लहान व्यवसायांपासून ते मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत सर्वजण झूमचा वापर मीटिंग्स, फोन, कॉन्टॅक्ट सेंटर आणि इतर सेवांद्वारे अखंडपणे संवाद साधण्यासाठी आणि कामाचे परिणाम साध्य करण्यासाठी करतात. यामध्ये झूम एआय कंपॅनियन चीही मदत मिळते. झूम ची स्थापना 2011 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे आहे. अधिक माहितीसाठी zoom.com ला भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments