पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी सन १९८८ पासून बँक ऑफ बडोदा, पि.सी.एम.सी.शाखे मध्ये महानगरपालिकेच्या विविध निधींची बँक खाती आहेत. सन २०१७ पासून सदर खात्यांवर प्रवेश नोंद – निर्गमन नोंद (स्विप इन – स्विप आऊट) सुविधा उपलब्ध होती.
दि. २६/०७/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडील कर व करेत्तर उत्पन्नाच्या दैनंदिन भरण्याच्या सेवा व सुविधां साठी बँक ऑफ बडोदा, पि.सी.एम.सी.शाखे बरोबर तीन वर्षां करीता करण्यात आलेल्या करारनाम्याची मुदत दि.२६/०७/२०२४ रोजी संपली होती.
सबब पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी, महाराष्ट्र शासन,वित्त विभागा कडील निर्णय क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.५१/१०/कोषा प्रशा-५ दि.१३/०३/२०२० नूसार राष्ट्रीयकृत बँकेची नेमणूक करण्या साठी, राष्ट्रीयकृत बँकेचे स्वारस्य अभिव्यक्ती (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मा.आयुक्त सो. याच्या कडील दि.०४/०७/२०२४ रोजीच्या मंजूर प्रस्तावा अन्वये लेखा/कावि/७९/२०२४ दि.०४/०७/२०२४ नूसार स्वारस्य अभिव्यक्ती (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्यात आले.
यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया व बँक ऑफ इंडीया यांचे कडून मुदती मध्ये प्रस्ताव बंद पाकीटात प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावाची बंद पाकीटे दि.११/०७/२०२४ रोजी उघडण्यात आली. प्राप्त प्रस्तावां नूसार तुलना करून मा.आयुक्त सो. यांच्या कडील दि.०६/०८/२०२४ रोजीच्या मान्य प्रस्तावान्वये पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडील सर्व प्रकारच्या उत्पन्नाच्या दैनंदिन भरण्याचे संकलन व खर्चा च्या सेवा व सुविधां साठी महानगरपालिकेच्या सर्व निधींची सर्व प्रकारची खाती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये उघडण्या साठी बँक ऑफ महाराष्ट्र बरोबर तीन वर्षांसाठी करार करण्यास मान्यता मिळाली आहे.
यास मा. स्थायी समिती ठराव क्र.३९१६ दि.१३/०८/२०२४ व मा. महानगरपालिका सभा ठराव क्र. ६९१ दि. २७/०८/२०२४ अन्वये मान्यता मिळाली आहे. यास्तव बँक ऑफ महाराष्ट्र मधील सेवा सुविधांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपरी शाखा यांच्या मध्ये दि.२५/०९/२०२४ रोजी करार करण्यात आलेला आहे. सबब सर्व निधीं चे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सर्व निधींसाठी खाती उघडण्यात आलेली आहेत.
पिंपरी -चिंचवड मनपाच्या व्यवहारांसाठी बॅक ऑफ महाराष्ट्र निवडीसाठी मान्यता
RELATED ARTICLES


