9 एप्रिल, मुंबई — भारतातील प्रमुख डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या हंगामा ओटीटीने आपली नवीन ओरिजिनल सिरीज ‘मंगलमुखी’ 9 एप्रिल 2026 रोजी लाँच केली. ही वाराणसी आणि मुंबईच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित एक वास्तववादी आणि थरारक क्राईम ड्रामा सिरीज आहे. या सिरीजमध्ये एला डी वर्मा मुख्य भूमिकेत असून, नामिश तनेजा, रति पांडे आणि तान्या शर्मा देखील आहेत. सिरीजमध्ये एका तणावपूर्ण हत्या रहस्यासोबत ओळख, सन्मान आणि सहनशक्ती यांची भावनिक कथा सांगितली आहे.
‘मंगलमुखी’ ही सिरीज मंगल नावाच्या एका ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) पोलीस अधिकारीच्या जीवनावर आधारित आहे. तिला तिच्या विभागाकडून नेहमीच दुर्लक्षित केले गेले आणि खिल्ली उडवली गेली. पण जेव्हा तिला एका लोकप्रिय टीव्ही स्टारच्या कॅमेऱ्यासमोर झालेल्या रहस्यमय मृत्यूची पहिली मोठी केस मिळते, तेव्हा तिचे आयुष्य अचानक बदलते, जे तिला वाराणसी सोडून मुंबईच्या मनोरंजन क्षेत्राच्या अंधाऱ्या जगात खेचून आणते. सुरुवातीला एक अपघात वाटणारी ही घटना लवकरच एका थरारक तपासात बदलते, ज्यामुळे मंगलला केवळ न्यायासाठीच नव्हे, तर तिच्या संपूर्ण कारकिर्दीत नाकारल्या गेलेल्या मान्यतेसाठीही लढा द्यावा लागतो.
तिच्या पात्राबद्दल बोलताना, एला डी वर्मा म्हणते, “मंगलमुखी ही फक्त एका पोलीस अधिकारीची कथा नाही, तर ती ओळख, धैर्य आणि आत्मविश्वासाची कथा आहे. तिचा हा प्रवास केवळ लिंगापुरता मर्यादित नाही. समाज तुमच्याकडे कसे पाहतो यावर तुमच्या क्षमता ठरत नाहीत, हे सिद्ध करण्याबद्दल हा प्रवास आहे. ती हुशार, धैर्यवान आणि निडर आहे, आणि म्हणूनच मला तिचे पात्र आवडले. ही भूमिका साकारताना मला भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव आला, आणि मला आशा आहे की प्रेक्षक तिच्या सामर्थ्याशी तितकेच जोडले जातील, जितके मी जोडले गेले.”
नामिश तनेजा म्हणतो, “ही अशी कथा अनुभवण्याची माझी पहिलीच वेळ आहे, आणि ट्रान्सजेंडर(तृतीयपंथी) अभिनेत्रीसोबत जवळून काम करणे हा एक अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता. एला ही एक अतिशय छान व्यक्ती आहे आणि ती तिच्या अभिनयात गहनता आणि प्रामाणिकपणा आणते. मंगलमुखी’बद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे, ही सिरीज अशा गोष्टीना सामान्य बनवते, ज्या नेहमीच सामान्य असल्या पाहिजेत – ती गोष्ट म्हणजे प्रतिभा आणि भावना लिंगापलीकडे जातात. या प्रवासाचा भाग होणे खूप खास आणि अर्थपूर्ण अनुभव होता.”
तिच्या अनुभवाबद्दल विचारल्यावर, रती पांडे म्हणते, “एक अभिनेत्री म्हणून मंगलमुखी मला अशा प्रकारे आव्हान देणारी होती, ज्याचा अनुभव मी यापूर्वी कधीच घेतला नव्हता. या सिरीजच्या थराराखाली एक मजबूत भावनिक धक्का आहे, आणि त्यामुळे ती इतकी आकर्षक बनते. ही कथा स्वतःला ओळखण्याबद्दल, आपले म्हणणे ऐकून घेण्याबद्दल आणि अशा जगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लागणारे धैर्य शोधण्याबद्दल आहे, जे जग अनेकदा तुम्हाला स्वीकारायलाच तयार नसते.
तान्या शर्मा सांगतात, “माझ्या या पात्राबद्दल मला सर्वात मनोरंजक वाटणारी गोष्ट म्हणजे, अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत वावरत असताना ती भीती, अनिश्चितता आणि दबावाचा सामना कशा प्रकारे करते. तिला अशा परिस्थितीत ओढले जाते जे तिच्या नियंत्रणाबाहेर असतात, आणि याच गोष्टीमुळे तिचा प्रवास खूप वास्तविक आणि समजण्यास सुलभ वाटते. मंगलमुखी केवळ एका रहस्यावर आधारित कथा नाही, तर त्यातील पात्रांबद्दल आणि ते त्यांच्या आयुष्यातील घटनांशी कसे जुळवून घेतात याबद्दल आहे.
‘मंगलमुखी’ आता हंगामा ओटीटीवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे, तसेच ती टाटा प्ले बिंग, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्स टीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डोर टीव्हीवर पाहता येऊ शकते.
हंगामा ओटीटी सादर करत आहे ‘मंगलमुखी’ – ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) पोलीस अधिकारीची रहस्यमय क्राइम सिरीज
RELATED ARTICLES


