*
*पुणे.*
*पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधुनिक फुल बाजाराच्या नावाखाली काढलेल्या 50 कोटीच्या टेंडर मध्ये (150) दीडशे कोटीचा घोटाळा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन कंत्राटी सचिव व प्रशासक बी जे देशमुख, विद्यमान सचीव दौंडकर व तत्कालीन सचिव, प्रशासक, अध्यक्ष, व तत्कालीन पणन संचालक व संबंधितांनी केल्याचा आरोप शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी केला आहे.*
*पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधुनिक फुल बाजार बांधकाम तसेच दोन उपबाजार समित्या यामध्ये केलेल्या बांधकामाच्या संदर्भात विठ्ठल राजे पवार यांनी यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री तसेच अंमलबजावणी संचलनालय पणन मंत्री व गृहमंत्री यांच्याकडे लेखी स्वरूपात केल्याचे पुरावे त्यांनी यावेळी सादर केले.. 49 कोटीच्या फुल बाजार समितीचे टेंडर मध्ये दीडशे कोटीचा घोटाळा झाल्याचा पुराव्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे हा घोटाळ्यात सर्वात अधिक जबाबदार कंत्राटी सचिव प्रशासक बीजे देशमुख असल्याचा आरोप देखील त्यांनी निवेदनात केलेला आहे…*
*यावेळी आधुनिक फुल बाजार व दोन उप बाजारात मध्ये केलेल्या टेंडरमध्ये 20 ते 30 टक्के अधिकच्या दराने मंजूर करून बोगस ठेकेदार नेमण्याची घटना व काम केलेले नसताना बोगस बिले काढणल्याचा देखील आरोप, पुरावे ६५ पानांचे निवेदनात केलेला आहे.*
*पुणे येथे आज दिनांक 10 एप्रिल रोजी पणन संचालक शरद जरे साहेब पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्यासमोर विभागीय सहनिबंधक यांनी चौकशी केलेल्या चौकशी अहवालाच्या सुनावणीच्या वेळी विठ्ठल राजे पवार यांनी गंभीर आरोप केला आहे..*
*राजे पवार पुढे म्हणाले की चौकशी अहवालात देखील चौकशी अधिकाऱ्यांनी अक्षम्य कर्तव्यात कसूर केल्याने संबंधितांवर देखील पणन अधिनियम तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम च्या कलमान्वये कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.*
*तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनेक व्यवहारात आर्थिक अनियमितता झालेला आहे च्या संदर्भात गेल्या दहा-बारा वर्षांपासून तक्रारी केलेले आहेत मात्र तारीख ते तारीख तारीख पे तारीख सुरू होती . या पाठीमागे ही दोन अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल केले मात्र त्यांनी मद धुंद प्रकारे चौकशी केल्याने संबंधितांनी केलेल्या चौकशी अहवालावर तक्रारदार विठ्ठल राजे पवार यांनी आक्षेप घेत पुन;ष्य चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली होती त्यानंतर पणन संचालक व मंत्री यांनी पुण्याचे विभागीय सहनिबंधक यांना चौकशी अधिकारी नेमणूक सुमारे 17 /18 विषयांच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र विभागीय सहनिबंध यांनी गंभीर विषयांना चुना लावून किरकोळ विषयाला अधिक चे महत्व देऊन चौकशी करण्यात जाणीवपूर्वक केली आहे. विभागीय सहनिबंधक सुर्वे हे पूर्वीच्या दोन चौकशी अधिकाऱ्यांच्या पुढचे निघाले त्यांची अवस्था आणि त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालांवरुन समजते. यासंदर्भात विठ्ठल राजे पवार यांनी गंभीर स्वरूपाच्या आक्षेप घेतलेला असून संबंधित चौकशी अधिकारी यांनी जाणीवपूर्वक अक्षम्य हलगर्जीपणा अपराध केला असल्याचा आरोप केलेला आहे. संबंधित चौकशी अधिकारी यांनी पणन विनयमन सहकार कायदा तसेच कर्तव्यात कसूर व कायद्याचा व पणन मंत्री पणन संचालक यांनी दिलेल्या अहवालाचा जाणीवपूर्वक कोर अवमान करत चौकशी अहवालाला केराची टोपली दाखवली आहे ते कृत्य चौकशी अधिकारी सुर्वे यांनी जाणीवपूर्वक केले असल्याचा आरोप करत सदरचे प्रकरण पणन संचालक व पणन मंत्री यांनी शंभर कोटी पेक्षा अधिक रकमेचा एकच टेंडरमध्ये घोटाळा झाल्याने संबंधित प्रकरणे अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडे द्यावे अशी मागणी केलेली आहे..*
*यावेळी सर्वच तक्रारदार यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशी अहवालावर गंभीर आक्षेप घेत चौकशी अधिकारी यांचेवर कठोर कारवाई करावी तसेच सदरचे प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाकडे सोपवावे अशी मागणी केलेली आहे सदर बाबत पुढील तारखेला सोनवणे वेळी मोठा हंगामा होण्याची शक्यता आहे..*
*या सुनावणीसाठी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे, बाजार समितीचे चेअरमन व्हाईट चेअरमन व सचिव उपस्थित होते..
सदर चौकशीची पुढील तारीख 24 एप्रिल ठेवले असल्याची माहिती विठ्ठल राजे पवार यांनी चौकशी झालेल्या पत्राच्या सोबतच माहिती दिलेली आहे.


