Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री हरी कीर्तनोत्तेजक सभेच्या अध्यक्षपदी डॉ.विलास पटवर्धन* कार्याध्यक्षपदी डॉ.नंदिनी पाटील ; श्री...

श्री हरी कीर्तनोत्तेजक सभेच्या अध्यक्षपदी डॉ.विलास पटवर्धन* कार्याध्यक्षपदी डॉ.नंदिनी पाटील ; श्री नारद विद्या मंदिर, पुणे

पुणे : श्री हरी कीर्तनोत्तेजक सभा, श्री नारद विद्या मंदिर, पुणे या संस्थेच्या १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३० या कालावधीसाठी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.विलास पटवर्धन आणि उपाध्यक्षपदी जयंत गोसावी व रामचंद्र भिडे यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेचे विश्वस्त म्हणून अरविंद नवरे, चंद्रशेखर ब्रह्मे व मनिषा घाटे यांची निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी डॉ.नंदिनी पाटील, कार्योपाध्यक्षपदी मकरंद औरंगाबादकर यांची निवड झाली आहे. सचिवपदी जयश्री देशपांडे व प्रेमा कुलकर्णी, तर कोषाध्यक्षपदी परेश देवळाणकर यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून विकास दिग्रसकर, मंदार गोखले, श्रीरंग औरंगाबादकर, श्रेयस कुलकर्णी, स्वानंद आळवणी व श्रद्धा भिडे यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अविनाश सोहनी यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments