Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपावसाळ्यापूर्वी नदीपात्राच्या सफाई करा,बाबा भिडे पुलाचे काम अजून किती वर्ष चालणार ?...

पावसाळ्यापूर्वी नदीपात्राच्या सफाई करा,बाबा भिडे पुलाचे काम अजून किती वर्ष चालणार ? संदीप खर्डेकर

पुणे, शहराच्या मध्यवर्ती भागात वाहणाऱ्या मुठा नदीपात्रातील कचरा तातडीने हटवण्यात यावा आणि भिडे पुल येथे सुरू असणारे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून त्याची पावसाळ्यापूर्वी सफाई होणे आवश्यक आहे अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने करत आहे.
विशेषतः डेंगळे पूल ते म्हात्रे पूल पर्यंत चा नदीपात्राचा भाग हा अत्यंत अस्वच्छ असून सोबत बाबा भिडे पुलाशेजारील काही छायाचित्र जोडत आहे.सदर कचरा नं हलविल्यास अवकाळी पावसाने किंवा ऐन पावसाळ्यात हा कचरा पुनःश्च नदीतून वहात जातो व शेजारील गावातून वाहताना तेथे अडकतो. याचे एक उदाहरण म्हणजे कवडीपाट येथे ह्या अडकलेल्या कचऱ्यामुळे तेथे येणारे परदेशी स्थलांतरित पक्षी कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे.
तसेच येथे नदीपात्रात मेट्रो चे साहित्य पडलेले असून ते देखील पावसाळ्यापूर्वी हलविणे गरजेचे आहे.
बाबा भिडे पुलाचे काम अनेक वर्ष सुरूच असून अनेकदा हा पूल वाहतुकीस बंद करून देखील येथे काम अपूर्ण असल्याचे दिसून येते. तरी मेट्रो व्यवस्थापनाशी चर्चा करून ह्या पुलाचे काम कधी पूर्ण होईल व येथील बॅरिकेड कधी काढले जातील याची माहिती जाहीर करावी.
आपण ह्या बाबत तत्परतेने कारवाई कराल अशी खात्री वाटते असे खर्डेकर यांनी म्हटले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments