Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशेतकरी चळवळीतील 'मा श्री विठ्ठल राजे पवार यांना, ''राष्ट्र रत्न संविधान...

शेतकरी चळवळीतील ‘मा श्री विठ्ठल राजे पवार यांना, ”राष्ट्र रत्न संविधान योद्धा पुरस्कार

*पुणे
गेल्या ४७ वर्षांपासून शेतकरी, कष्टकरी व कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे ‘विठ्ठल राजे पवार, हे अखिल भारतीय धार संस्थान राजे पवार परिवारातील एक लढाऊ व संविधाननिष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा ध्यास घेतला आहे. वीज बिल मुक्ती, साखर कारखान्यांवरील कोट्यवधींची करवसुली स्थगिती, दूध उत्पादकांना किमान दर, तसेच एफआरपी व गॅरंटी बेस रेट एमएसपीसाठीचा आणि कशी किंमत न्यायाधीकरण, स्थापावे यासाठी लढा अशा अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना हजारो कोटींची नुकसानभरपाई मिळवून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. देशातील २७ राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार करून शेतकरी चळवळीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर दृढ श्रद्धा ठेवून संविधानाच्या चौकटीत राहून ‘बहुजन हिताय – शेतकरी सुखाय, साठी त्यांनी संघर्ष उभारला आहे. वैयक्तिक संपत्तीचा त्याग करून, अनेक हल्ले व अटकांचा सामना करत त्यांनी केवळ शेतकरी हितासाठी शेतकरी चळवळ जिवंत ठेवली. शेतकऱ्यांच्या प्रत्येक उत्पादनाला हमीभाव मिळावा यासाठी त्यांचा लढा आजही अखंड सुरू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून त्यांचा *’राष्ट्र परिवार वृत्तपत्र सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने, शेतकरी चळवळीतील ‘विठ्ठल राजे पवार यांना, ”राष्ट्र रत्न संविधान योद्धा पुरस्कार देऊन,,* होणारा सन्मान हा त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव आहे असे आम्ही मानतो….
“जय किसान, जय संविधान” हा त्यांचा ध्यास महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रातील कोट्यावधी शेतकऱ्यांना प्रेरणा देत राहील….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments