Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त *राष्ट्रीय...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय,मोतीबाग* येथे भव्य रक्तदान शिबिर

पुणे
(प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शनिवार पेठेतील अहिल्यादेवी शाळेच्या समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,मोतीबाग कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय संस्कृती संवर्धक संस्थे तर्फे मोतीबाग संघ कार्यालयात दर वर्षी १४ एप्रिल रोजी डॉ बाबांसाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.यंदाचे हे चौथे वर्ष आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शाश्वत अकॅडमी चे संचालक महेश पाटील यांचे हस्ते मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कूल समोरील मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात उद्घाटन होणार असून या प्रसंगी युनिक एअर एक्स्प्रेस इंटरनॅशनल कुरिअर व रिअल इस्टेट मधील प्रथितयश व्यावसायिक योगेश शिंदे ह्यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे.
“जनकल्याण रक्तपेढी” चे सहकार्य ह्या शिबिरास लाभणार असून
रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.तरी जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावे असे आवाहन भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी व कार्यवाह प्रसाद खेडकर यांनी केले आहे.हे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सागर दरेकर,भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे कोषाध्यक्ष किरण गांधी,विश्वस्त उदय पंचपोर,राजेंद्र वालेकर,बाजीराव तथा आप्पा मणेरे,प्रकाश आठवले प्रयत्नशील आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments