Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन संपन्न*

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन संपन्न*

*

पुणे, दि.१३: विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.

यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तक्रारदार उपस्थित होते.

विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनात नव्याने दाखल दोन प्रकरणांचा समावेश होता. या अर्जदारांना तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबतच्या कागदपत्रांसह आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊन श्रीमती द्विवेदी यांनी सुनावणी घेतली.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments