*‘
*मुंबई (विरार), प्रतिनिधी |साप्ताहिक किसान डायरी, पुणे.*
*दिनांक : १२ एप्रिल २०२६.*
*वसई-विरार (मुंबई) येथे आज दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी साहित्यप्रेमींसाठी एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. धार संस्थान राजे पवार परिवारातील हरहुन्नरी कवयित्री सौ. भारती हरीश पवार राजे यांच्या ‘ऋतुरंग’ या दुसऱ्या कवितासंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.*
हा सोहळा वसई-विरार महानगरपालिका ग्रंथालय सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी अशोक नायगावकर आणि ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतीभा पाटील यांच्यासह विविध साहित्यिक, कवी, उद्योजक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. साहित्य रसिकांची तुडुंब गर्दी झाल्याने संपूर्ण वातावरण काव्यमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.
उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी ‘ऋतुरंग’ या कवितासंग्रहाचे विशेष कौतुक करत कवयित्री भारती पवार राजे यांच्या लेखनशैलीचे अभिनंदन केले. तसेच अरुण म्हात्रे यांनीही त्यांच्या काव्यप्रवासाचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कवयित्री भारती हरीश पवार राजे यांनी उद्घाटक, प्रकाशक तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि आपल्या कवितेची एक सुंदर झलक सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.
कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेच्या सन्माननीय सदस्या म्हणून कार्यरत असलेल्या भारती पवार राजे यांच्या काव्यप्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. ‘साहित्य जल्लोष’ संमेलनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या लेखनशैलीचे मनापासून कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
दुपारी ३ वाजता संत जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा (विरार) येथे सुरू झालेल्या या कार्यक्रमाने मराठी साहित्यविश्वात एक वेगळा ठसा उमटवला. ‘ऋतुरंग’ या कवितासंग्रहामुळे मराठी काव्यविश्वाला नवी ऊर्जा आणि नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
ऋतुरंग’चा काव्यमय जल्लोष!* *कवयित्री भारती हरीश पवार राजे यांच्या संग्रहाचे विरारमध्ये दिमाखदार प्रकाशन.*
RELATED ARTICLES


