Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedएम.ई.एम.एस. (M.E.M.S-108) १०८ रुग्णवाहिका ताफ्याला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय तंत्रज्ञानाने सज्ज करण्यासाठी ...

एम.ई.एम.एस. (M.E.M.S-108) १०८ रुग्णवाहिका ताफ्याला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय तंत्रज्ञानाने सज्ज करण्यासाठी सुमित एसएसजीची स्पेन्सर इंडियासोबत भागीदारी

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ई.एम.एस. परिवर्तनांतर्गत १,७५६ रुग्णवाहिकांमध्ये युरोपियन मानकांची आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे तैनात केली जाणार

महाराष्ट्र |14 एप्रिल, 2026: भारतातील आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादाची मानके उंचावण्यासाठी, सुमित एसएसजीने आज प्रगत आपत्कालीन वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या युरोपमधील आघाडीच्या स्पेन्सर इटालिया एस.आर.एल. चा भाग असलेल्या स्पेन्सर इंडियासोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली. या सहकार्याद्वारे, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एम.ई.एम.एस. १०८) अंतर्गत १,७५६ रुग्णवाहिका जागतिक स्तरावर प्रमाणित स्ट्रेचर्स, स्थलांतर यंत्रणा, इममोबिलायझेशन उपकरणे आणि गंभीर बचावासाठी आवश्यक उपकरणांनी सज्ज केल्या जातील.

ही भागीदारी पुढील काही वर्षांच्या कालावधीत पूर्ण केली जाईल, ज्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. याद्वारे, एम.ई.एम.एस. १०८ हे मोठ्या प्रमाणावर संपूर्ण युरोपियन मानकांचे प्री-हॉस्पिटल केअर इकोसिस्टम स्वीकारणारे भारतातील पहिल्या राज्यस्तरीय आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ई.एम.एस.) नेटवर्कपैकी एक ठरेल.

सुमित एसएसजीचे अध्यक्ष श्री सुमित साळुंके म्हणाले, “स्पेन्सरसोबतची आमची भागीदारी भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील एक महत्त्वपूर्ण क्षण ठरणार आहे. एम.ई.एम.एस. १०८ हा केवळ रुग्णवाहिकांचा ताफा नसून ही एक संपूर्ण जीवनरक्षक परिसंस्था आहे. जागतिक स्तरावर सिद्ध झालेली उपकरणे समाविष्ट करून, आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णवाहिका सुरक्षितता, विश्वासार्हता आणि वैद्यकीय उत्कृष्टतेची सर्वोच्च मानके पूर्ण करेल.”

स्पेन्सर इंडियाचे एम.डी. श्री मनीष मलिक पुढे म्हणाले, “ही भागीदारी बहु-वर्षीय कालावधीत राबवली जाईल. लवकरच याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू होईल आणि पुढील टप्प्यांमध्ये संपूर्ण ताफ्यात एकीकरण अपेक्षित आहे. याद्वारे, एम.ई.एम.एस. १०८ हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण युरोपियन मानकांचे प्री-हॉस्पिटल केअर इकोसिस्टम स्वीकारणारे भारतातील पहिल्या राज्यस्तरीय आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) नेटवर्कपैकी एक ठरेल.”

या भागीदारीअंतर्गत, सुमित एसएसजी स्पेन्सरच्या प्रगत आपत्कालीन वैद्यकीय सोल्यूशन्सचा समावेश करेल, ज्यामध्ये:

रुग्ण हाताळणीसाठी विशेष उपकरणे, जसे की प्रगत स्ट्रेचर्स, स्कूप स्ट्रेचर्स आणि ट्रान्सपोर्ट चेअर्स.
ट्रॉमा केअरसाठी (अपघातातील गंभीर दुखापत) डिझाइन केलेली मान आणि मणका स्थिर ठेवणारी यंत्रणा.
पेटंट केलेली बचाव आणि स्थलांतर यंत्रणा.
गंभीर परिस्थितीमध्‍ये रूग्‍णाला ऑक्सिजन पुरवठा करण्‍यासाठी यंत्रणा.
वेगवान, सुरक्षित आणि अर्गोनॉमिक आपत्कालीन प्रतिसादासाठी तयार केलेले पीपीई किट्स.
हे उपाय परिचालन कार्यक्षमता वाढवण्यासाठी, रुग्णांवरील उपचारांचे परिणाम सुधारण्यासाठी आणि जागतिक मानकांच्या साधनांसह अग्रभागी असलेल्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी तयार केले आहेत.

मेम्स १०८ प्रकल्पावरील परिणाम:

संपूर्ण ताफ्यात युरोपियन मानकांची रुग्ण हाताळणी आणि वाहतूक व्यवस्था.
पॅरामेडिक्स आणि ईएमटीसाठी सुधारित सुरक्षा आणि अर्गोनॉमिक्स.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे जलद आणि अधिक सुलभ स्थलांतर.
मजबूत ट्रॉमा मॅनेजमेंट आणि रुग्णाची प्रकृती स्थिर करण्याची क्षमता.
जागतिक आपत्कालीन वैद्यकीय सेवा मानकांशी सुसंगतता.
ही भागीदारी भारतातील सर्वात प्रगत आणि विस्तारयोग्य आपत्कालीन वैद्यकीय सेवा नेटवर्क उभारण्याच्या सुमित एसएसजीच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते, ज्यामध्ये जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि भक्कम ऑन-ग्राउंड प्रतिसाद पायाभूत सुविधांचा मेळ घातला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments