Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमनःशांती- विश्वशांतीसाठी भारतीय योग व सूर्यनमस्कार दिशादर्शक पोलंडचे तज्ञ डॉ. क्रिश्टॉफ स्टेक...

मनःशांती- विश्वशांतीसाठी भारतीय योग व सूर्यनमस्कार दिशादर्शक पोलंडचे तज्ञ डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांचे विचार विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या निवासस्थानी घडला हृद्य संवाद

पुणे, ११ एप्रिल ः सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शारीरिक स्वास्थ, योग चिकित्सा, मनःस्वास्थ आणि पर्यायाने समाज स्वास्थ साध्य करणे आजच्या वैश्विक अशांतीच्या काळात गरजेचे आहे, असे विचार वॉर्सा, पोलंड येथील शारीरिक शिक्षण शास्त्रातील तज्ञ प्राध्यापक डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांनी व्यक्त केले.

भारत भेटीवर आले असतांना ते थोर शिक्षण तज्ज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड यांच्या विश्वशांती क्षेत्रातील कार्याने प्रभावीत होऊन त्यांना भेटायला कोथरुड येथील त्यांच्या निवासस्थानी आले. यावेळी निमंत्रतासाठी एक स्नेहमेळावा आयोजीत करण्यात आला होेता.

या प्रसंगी डॉ. स्टेक यांना मानाची शाल आणि जगतातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

आपली भावना व्यक्त करताना डॉ. क्रिश्टॉफ स्टेक म्हणाले, भारतीय संस्कृती ही नुसती एक जीवनशैली नसून ती जीवनाचे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. विविध धर्म, कला, संगीत, संस्कार आणि परंपरा यांचे संगम असलेली भारतीय संस्कृती केवळ भारताच नव्हे तर संपूर्ण जगभर आदर्श मानली जाते. त्याची सुंदरता, विचार आणि त्याची संस्काराधारा हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा आधार बनतात. विविधता, अध्यात्म आणि वसुधैव कुटुंबकम या तत्वावर आधारित आध्यात्मिक व नैतिक मूल्ये, योग व आयुर्वेद यांचे मानवाच्या विकासात योगदान तसेच मानवतेची शिकवण देते.

विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी भावना व्यक्त केली की सध्याच्या युद्ध जन्य परिस्थितीमध्ये जेव्हा जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, अशा वेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध स्थगितीची घोषणा करुन जगाला एका मोठ्या संकटापासून वाचविले आहे. त्याबद्दल राष्ट्रपती ट्रम्प आणि इराणचे सरकार यांचे आभार.
डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांच्या भेटीच्या निमित्ताने जगात शांतता आणि सद्भाव पसरविण्याचा संदेश दिला जावा अशी आशा ही डॉ. कराड यांनी व्यक्त केली. विश्वगुरु भारताची ही स्वत्वाचा बोध घेणारी मालिका कायम सुरू राहिली पाहिजे असे त्यांनी उपस्थितांना संबोधिले.

माईर्स चे रजिस्ट्रार डॉ. रत्नदीप जोशी यांनी सांगितले की, डॉ. स्टेक यांनी पोलंड येथील यान युनिव्हर्सिटीमधून शारीरिक शिक्षणात पीएचडी केली आहे. ते गेल्या ५० वर्षापासून भारतात येऊन येथे त्यांनी कैवल्य धाम योगसंस्था, बनारस हिदू युनिव्हर्सिटी इ. संस्थामधून संस्कृत आणि योगविषयी संशोधन केले आहे. भारतीय संस्कृतीचे वैश्विक वैचारिक दर्शन सर्व जगाला घडविण्यासाठी युरोप पासून सर्व खंडांमध्ये डॉ स्टेक करीत असलेले कार्य भारतमातेचे गौरवशाली महात्म्य वर्णन करते.

या प्रसंगी प्रा.डॉ. कराड सर यांच्या प्रेरणादायी जीवनयात्रेवर आधारित डॉ. संजय उपाध्ये यांनी रचलेल्या निवडक गीतांचे सांगीतिक सादरीकरण प्रा. शशांक दिवेकर यांनी केले. प्रा. शशांक दिवेकर यांनी या गीतांना श्रवणीय चाली बाधले आहेत. पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृतींचे ऋणानुबंध घट्ट करून वसुधैव कुटुम्बकम या तत्वाचे सर्वांना स्मरण करून देणारा हा हृदय संवाद उपस्थित निमंत्रित सर्वांना खूपच भावला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ट मान्यवर या ज्ञान चर्चासत्रासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments