पुणे, १५ एप्रिल २०२६ : टोयोटा मोटर किर्लोस्करने (टीकेएम) आज विप्रो ३ डीसोबत बिदादी येथील टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (टीटीटीआय) येथे अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला. या उपक्रमाचा उद्देश उद्योग–शैक्षणिक सहकार्य बळकट करणे आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञानामध्ये भविष्यकालीन कौशल्ये विकसित करणे हा आहे.
या सामंजस्य स्वाक्षरी कार्यक्रमास दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून हिरोकी अँडो, व्हाइस प्रेसिडेंट – एचआर अँड सर्व्हिसेस, तसेच लक्ष्मीकेशव शास्त्री, व्हाइस प्रेसिडेंट – आयटी, डिजिटल आणि सायबर सिक्युरिटी उपस्थित होते. विप्रो 3डीकडून प्रातिक कुमार, सीईओ, विप्रो इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग; श्रीपद रामनाथन, व्हाइस प्रेसिडेंट आणि फायनान्स हेड; यथिराज कासल, जनरल मॅनेजर आणि बिझनेस हेड, विप्रो 3डी; तसेच दीपक, सेल्स हेड उपस्थित होते.
हे सेंटर ऑफ एक्सलन्स कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि नवोदित विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ म्हणून कार्य करेल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्या प्रत्यक्ष औद्योगिक वापराचा अनुभव मिळेल. हा उपक्रम प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उदयोन्मुख उत्पादन तंत्रज्ञानांचा समावेश करून विद्यार्थ्यांना आधुनिक उत्पादन प्रक्रियेचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
या सहकार्याअंतर्गत, विप्रो 3डी तांत्रिक कौशल्य, कार्यबल उन्नती आणि संरचित प्रशिक्षण मॉड्यूल प्रदान करेल. या कार्यक्रमामध्ये इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, लाईव्ह इंडस्ट्री प्रोजेक्ट्स, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कार्यशाळा आणि ज्ञान-वाटप उपक्रमांचा समावेश असेल. तसेच, काईझेन-आधारित सतत सुधारणा पद्धती आणि इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञान जसे की डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट सिस्टीम्स आणि संसाधन अनुकूलन यावरही भर दिला जाईल.
हा उपक्रम रॅपिड प्रोटोटायपिंग, उत्पादन सहाय्यक साधनांचा विकास, हलक्या आणि ऑप्टिमाइज्ड घटकांची निर्मिती तसेच गरजेनुसार पार्ट्स तयार करण्यास सक्षम करेल. यामुळे नवीन उत्पादन विकास (NPD) जलद होईल, असेंब्ली लाईनची कार्यक्षमता वाढेल, लीड टाइम कमी होईल आणि ऑपरेशनल लवचिकता सुधारेल.
या सहकार्याबाबत बोलताना, टीकेएमचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर श्री जी. शंकरा म्हणाले, “टीकेएममधील आमचे मानव संसाधन विकास तत्त्वज्ञान टोयोटाच्या सतत सुधारणा आणि लोकांचा सन्मान या दोन मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे. आम्ही नवीन युगातील तंत्रज्ञानामध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. हा उपक्रम भविष्याभिमुख प्रतिभा घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि भारताच्या ‘स्किल इंडिया मिशन’ला बळकटी देईल.”
विप्रो 3डीचे बिझनेस हेड आणि जनरल मॅनेजर यथिराज कासल म्हणाले, “ही भागीदारी क्षमता विकास आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून भारताच्या उत्पादन क्षेत्राला बळकट करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, तसेच उद्योगसुसंगत शिक्षण अनुभव निर्माण करण्यासाठी महत्त्वाची आहे.”
2007 मध्ये स्थापन झालेले टीटीटीआय हे भारतातील व्यावसायिक शिक्षणासाठी एक आदर्श संस्थान म्हणून विकसित झाले आहे, जे ऑटोमोबाईल असेंब्ली, वेल्डिंग, पेंटिंग आणि मेकॅट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये तीन वर्षांचा पूर्णतः निवासी प्रशिक्षण कार्यक्रम देते. 2023 मध्ये, टीटीटीआयने आपली वार्षिक प्रवेश क्षमता 1200 वरून 2400 पर्यंत वाढवली असून, त्यापैकी निम्म्या जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवून तांत्रिक शिक्षणातील लैंगिक समावेशनाला चालना दिली आहे.
९२४०१००६५०६०९०२
टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि विप्रो यांच्यात सामंजस्य करार
RELATED ARTICLES


