*
पुणे – भारतीय विचार साधनाच्या ‘मला उमगलेला संघ’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता लेडी रमाबाई हॉल, स.प. महाविद्यालय येथे होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त हे पुस्तक प्रकाशित होत आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात विविध क्षेत्रांतील 32 मान्यवरांनी संघविषयक मनोगते मांडली आहेत. प्रख्यात संगीतकार राहुल रानडे आणि प्रसिद्ध अभिनेते-लेखक-दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध पत्रकार संपादक, यु ट्युबर भाऊ तोरसेकर यांची ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार विशेष मुलाखत घेणार आहेत. या सोहळ्यास साहित्यप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांनी आहे.
‘मला उमगलेला संघ’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन*
RELATED ARTICLES


