Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात बालकल्याणासाठी ‘हिमालया बेबीकेअर’तर्फे ‘हेल्दी बेबी कॉन्टेस्ट’चे आयोजन

पुण्यात बालकल्याणासाठी ‘हिमालया बेबीकेअर’तर्फे ‘हेल्दी बेबी कॉन्टेस्ट’चे आयोजन

 

 

~ पुण्यातील या समाजाभिमुख उपक्रमातून पालक आणि आरोग्य तज्ज्ञ एकत्र; बाळांच्या सर्वांगीण

 

संगोपनाबाबत जनजागृती ~

 

*पुणे, १७ एप्रिल २०२६ :* हिमालया बेबीकेअर या भारतातील आघाडीच्या व लोकप्रिय बेबीकेअर ब्रॅंडने

स्माईल फाउंडेशनच्या सहकार्याने पुण्यात ‘हेल्दी बेबी कॉन्टेस्ट’ नुकतीच आयोजित केली. या उपक्रमात

माता, त्यांची बाळे, समुदाय आरोग्य कर्मचारी आणि बालसंगोपन तज्ज्ञ एकत्र आले होते. बालकांचा

सर्वांगीण विकास, मातांचे आरोग्य आणि बालसंगोपनाच्या सुरुवातीच्या पद्धती यांबाबत जनजागृती

करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.

या स्पर्धेत १३०हून अधिक मातांनी आणि त्यांच्या बाळांनी उत्साहाने भाग घेतला. आरोग्य तज्ज्ञ आणि

‘स्माईल फाउंडेशन’ची प्रोग्रॅम टीम यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला. संपूर्ण वातावरण उत्साही आणि

समाजाभिमुख होते. त्यातून मातांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्याबाबत समाजात मोठी उत्सुकता

असल्याचे दिसून आले. स्पर्धेदरम्यान बाळांच्या हालचालींची कौशल्ये, त्यांची उंची, वजन आणि सक्रियता

अशा महत्त्वाच्या विकास घटकांवर मूल्यमापन करण्यात आले.

हिमालया बेबीकेअर आणि स्माईल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या ‘हेल्दी बेबी कॉन्टेस्ट’चे विजेते जाहीर

केले. अंकित बराणे आणि कियारा गणेश बडगुजर यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. वैष्णव एरंडे आणि

शिव आकाश राठोड यांना दुसरा क्रमांक, तर स्वरा पाटील आणि संघमित्रा जगदीश खोब्रागडे यांना तिसरा

क्रमांक देण्यात आला. सर्व विजेत्यांना विशेष प्रमाणपत्र आणि हिमालया बेबी गिफ्ट पॅक देण्यात आला.

तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र, माइलस्टोन बुकलेट आणि हिमालया बेबीकेअर सॅम्पल पॅक

असलेली गूडी बॅग देण्यात आली.

विकासाच्या मूल्यमापनासोबतच या प्रसंगी मातांना स्तनपान, बाळांचे पोषण, स्वच्छता, लसीकरणाचे

वेळापत्रक आणि शिशूसंगोपन यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारे माहितीपूर्ण आणि निरोगी

पद्धतीने बाळांची काळजी घेण्याचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले.

या उपक्रमाबाबत ‘हिमालया वेलनेस कंपनी’चे बेबीकेअर विभागाचे संचालक चक्रवर्ती एन. व्ही. म्हणाले,

“बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सुरुवातीची वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. ‘हेल्दी बेबी

कॉन्टेस्ट’च्या माध्यमातून पालकांना वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपलब्ध साधने देण्याचा आमचा उद्देश आहे;

जेणेकरून बाळाच्या आरोग्याची मजबूत पायाभरणी ही सुरक्षितता आणि विश्वास यांच्या आधारे होईल.

स्थानिक समुदाय संस्थांसोबत भागीदारी करून आम्ही तळागाळातील कुटुंबांपर्यंत पोहोचत आहोत. प्रत्येक

बाळाची सौम्यपणे, सुरक्षितपणे आणि माहितीपूर्ण आधारावर काळजी घेण्याचा संदेश आम्ही देत आहोत.”

‘स्माईल फाउंडेशन’च्या ‘स्वाभिमान’ आणि ‘एम्पॉवरिंग ग्रासरूट्स’ या उपक्रमांच्या प्रमुख सरिता प्रधान

म्हणाल्या, “स्माईल फाउंडेशनच्या ‘स्वाभिमान’ उपक्रमांतर्गत आम्ही सामुदायिक स्तरावर मातांचे आणि

बालकांचे आरोग्य बळकट करण्यावर लक्ष देतो. बाळांचे लहान वयातील योग्य पोषण, त्यांची काळजी

आणि त्यासंदर्भात पालकांची जागृती यांतून दोघांच्याही आयुष्यावर सकारात्मक परिणाम होत असतो.

पुण्यातील निघोजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘हिमालया वेलनेस’च्या भागीदारीमध्ये आम्ही हा ‘हेल्दी

 

बेबी कॉन्टेस्ट’चा उपक्रम आयोजित केला. त्यावेळी आम्ही १३०हून अधिक मातांशी आणि त्यांच्या बाळांशी

थेट संवाद साधला आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांत निरोगी सवयींचे किती महत्त्व आहे हे मातांना

समजावून सांगितले.”

‘हेल्दी बेबी कॉन्टेस्ट’च्या या व्यासपीठावर मातांना तज्ज्ञांशी संवाद साधण्याची, बाळांच्या संगोपनातील

पोषण व स्वच्छता यांसारख्या महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याची आणि निरोगी पालकत्वाचा आनंद साजरा

करण्याची संधी मिळाली.

अशा उपक्रमांमधून पालकांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन देत निरोगी व आनंदी बाळांच्या

संगोपनासाठी आपली कटिबद्धता हिमालया बेबीकेअर ब्रॅंड व्यक्त करीत असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments