Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसेरेब्रोस्पार्क इनोव्हेशनतर्फे महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन व महा ड्रोन यात्रेचा शुभारंभ...

सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशनतर्फे महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन व महा ड्रोन यात्रेचा शुभारंभ आज

 

पुणे, ३० एप्रिलः महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन अंतर्गत सेरेब्रोस्पार्क इूनोव्हेशन्सतर्फे १०० कृषी ड्रोन वितरण उपक्रम उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र दिन म्हणजे १ मे रोजी दुपारी ३ ते ५ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणातील सभागृहात होणार आहे. तसेच महा ड्रोन यात्रेची सुरूवात करण्यात येण्याची माहिती सेरेब्रोस्पार्क इूनोव्हेशन्सचे गणेश थोरात आणि मिहीर केदार यांनी दिली.
मिहीर केदार यांनी सांगितले की, ” महा ड्रोन यात्रे मध्ये विशेष सुसज्ज वाहने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करुन प्रत्येक गावात ड्रोनचे प्रात्यक्षिक सादरीकरण करतील. यामुळे शेतकर्‍यांना ड्रोन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती मिळेल आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्याच प्रमाणे शेती क्षेत्र आधिक कार्यक्रम व सुरक्षित बनेल.”
गणेश थोरात यांनी सांगितले की, ” महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशनची सुरूवात ही राज्याच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवी क्रांती घडविणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन गेल्या ६ वर्षापासून ८० ते १०० किलोपर्यंतचे विविध क्षमतेचे ड्रोन विकसित करतात. कृषी, सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रात यशस्वी कार्य करीत आहेत. डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था म्हणून आम्ही ड्रोन पायलट प्रशिक्षण ही देण्याचे कार्य करतो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परितर्वन घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.”
राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments