Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedफोर्स मोटर्सचा तिमाही निकाल जाहीर

फोर्स मोटर्सचा तिमाही निकाल जाहीर

 

 

पुणे, 30 एप्रिल २०२६: फोर्स मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक आणि अग्रगण्य ऑटोमोटिव्ह कंपनीने आज ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाचे (चौथी तिमाही व आर्थिक वर्ष २०२५-२६) आर्थिक निकाल जाहीर केले.

 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत बाजारपेठेत मागील वर्षाच्या तुलनेत एकूण घाऊक विक्रीमध्ये २० टक्‍के वाढ नोंदवण्यात आली. व्हॅन विभागातील निर्विवाद वर्चस्व कायम राखत कंपनीने ट्रॅव्हलर प्लॅटफॉर्मने विभागात सातत्याने ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त हिस्‍सा ठेवला आहे. ग्रामीण आणि अर्ध-शहरी बाजारपेठांमध्‍ये विस्तार केला. मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

 

कंपनीने प्रत्येक तिमाहीत सातत्यपूर्ण कामगिरी, सुधारित ऑपरेटिंग लेव्हरेज आणि सर्व उत्पादन विभागांमधील व्यापक वाढीमुळे आतापर्यंतची सर्वात उत्तम संपूर्ण वर्षाची आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. हे वर्ष फोर्स मोटर्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे, ज्‍यामधून कंपनीची केंद्रित, स्थिर आणि शिस्तबद्ध व्यावसायिक वृत्ती दिसून येते.

कंपनीच्‍या या कामगिरीमधून व्‍यवसायाचा विस्‍तार, तसेच उत्पन्नाच्या दर्जात झालेली सुधारणा देखील दिसून येते. हे यश प्रामुख्याने लक्ष्यित प्रॉडक्ट मिक्स (उत्पादन श्रेणी), कार्यात्मक शिस्त आणि ऑपरेटिंग लेव्हरेजमुळे स्थिर खर्चाचे झालेले उत्तम नियोजन यामुळे शक्य झाले आहे.

या वर्षातील वाढ सर्व मुख्य प्लॅटफॉर्मवर सर्वसमावेशक राहिली आहे. कंपनीने आपल्या मूळ व्हॅन विभागात ७० टक्‍क्यांसह आपले वर्चस्व कायम राखले आहे, तर प्रीमियम पॅसेंजर मोबिलिटीमध्ये आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आपला विस्तार वाढवला आहे.

फोर्स मोटर्सने आपला शून्य-कर्ज दर्जा कायम राखला आहे, ज्‍यामधून कंपनीची आर्थिक सतर्कता आणि शिस्तबद्ध भांडवल वाटपाप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते.

या उत्कृष्ट कामगिरीबाबत मत व्‍यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्‍टर) श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, “आमच्या स्थापनेपासूनच आम्ही नवनवीन विभागांची निर्मिती करण्यात अग्रणी राहिलो आहोत. आता अर्बेनियाच्या प्रबळ उपस्थितीद्वारे आम्ही प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी विभागात पुढाकार घेऊन त्याचे नेतृत्व करत आहोत, तर दुसरीकडे ट्रॅव्हलर आणि ट्रॅक्स सारखे प्लॅटफॉर्म बाजारपेठेत कंपनीचा विस्तार आणि व्याप्ती वाढवण्याचे काम सातत्याने करत आहेत. तसेच, संस्थात्मक आणि संरक्षण क्षेत्रातील ग्राहकांशी असलेल्‍या आमच्‍या सहयोगामधून आमची तांत्रिक अभियांत्रिकी क्षमता आणि आव्हानात्मक व सतत बदलणाऱ्या वातावरणात सेवा देण्याची आमची क्षमता दिसून येते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ हे आमच्या प्रवासातील एक अभूतपूर्व वर्ष ठरले आहे, जिथे प्रत्येक तिमाहीत झालेल्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीचे रूपांतर आतापर्यंतच्या आमच्या सर्वात प्रबळ आर्थिक कामगिरीमध्ये झाले आहे. ज्या क्षेत्रात आम्ही नेतृत्व करू शकतो आणि नवीन बाजारपेठ निर्माण करू शकतो अशा विभागांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, तसेच सुधारित ऑपरेटिंग लेव्हरेज आणि अधिक संतुलित प्रॉडक्ट मिक्सच्या पाठबळामुळे हे यश साध्य झाले आहे.

भविष्याचा विचार करता, आम्ही सातत्य आणि शिस्तीने व्यवसायाची उभारणी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत राहून आमची उत्पादने, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षमता अधिक दृढ करणे, हेच आमच्या वाढीच्या पुढच्या टप्प्यामध्‍ये महत्त्‍वाचे असेल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments