Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorized*जाधवर इन्स्टिट्यूटची १०० टक्के निकालाची परंपरा कायम* इयत्ता १० वी च्या...

*जाधवर इन्स्टिट्यूटची १०० टक्के निकालाची परंपरा कायम* इयत्ता १० वी च्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 

 

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी च्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. यामध्ये शार्दूल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून दरवर्षीची ही परंपरा शाळेने यंदाही कायम ठेवली आहे.

 

शार्दूल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयातील सौरभ कडू (९२.४०), ईश्वरी अरेकर (९१.२०) आणि दीपिका बाग्रेचा (९१) यांनी यश मिळविले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. तसेच या यशाबद्दल कौतुकही केले.

 

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल मधील आशिष बागुल (९४), रुद्र तुपे (९१.४०) आणि सानिका सागर (८९.४०) यांनी शाळेत सर्वोकृष्ट गुण मिळविले आहेत. याशिवाय प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयातील सोहम मरगळे (८९.२०), कल्याणी धर्मावत (८८.६०), आदित्य परांडे (८५.६०) यांनी यश मिळविले. जाधवर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्यू. कॉलेज मधील शनी गुप्ता (८८), विनिता वर्मा (७९.६०) शार्दूल जोशी (७६.४०) यांनी शाळेमध्ये अव्वल क्रमांक पटकाविले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments