Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासनाच्या सहकार्याने पुणे RMC उद्योग पुन्हा सुरू करण्याची घोषणा व नागरिकांसाठी...

शासनाच्या सहकार्याने पुणे RMC उद्योग पुन्हा सुरू करण्याची घोषणा व नागरिकांसाठी हेल्पलाइन उपक्रम

आरएमसी असोसिएशनतर्फे जिल्हा प्रशासन तसेच सर्व संबंधित प्राधिकरणांनी दिलेल्या सकारात्मक सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. पुणे येथील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योगासमोरील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने घेतलेल्या निर्णयांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

 

मा. जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांच्या नेतृत्वाखाली, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, तसेच वाहतूक पोलीस अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि PMRDA या सर्व प्राधिकरणांनी पुणे RMC उद्योगासाठी एकसमान व व्यवहार्य मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्यासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

 

तसेच रेडी मिक्स काँक्रीट (RMC) भागधारकांचे आभार :

 

खालील उद्योग संघटना व सर्व संबंधित भागधारकांचे आम्ही विशेष आभार मानतोः

 

NAREDCO, CREDAI, MBVA, BAI, PESA, CCPA, ICI and ISSE

तसेच सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारे हितचिंतक यांचेही मनःपूर्वक आभार.

 

प्रेस व मीडिया प्रतिनिधी तसेच पुणेकर नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही विशेष आभारी आहोत.

 

पुणे जिल्ह्यातील सर्व स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील RMC प्लांट मालकांनी दाखविलेल्या एकजुटीबद्दल, शिस्तबद्धतेबद्दल व संयमाबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

 

कामकाज पुन्हा सुरू करण्याबाबत घोषणा

 

आज झालेल्या अंतर्गत बैठकीत ३०० हून अधिक सदस्यांशी चर्चा करून व प्रशासनाशी झालेल्या संवादाचा आढावा घेऊन आम्ही पुढील निर्णय जाहीर करीत आहोत:

 

पुणे जिल्ह्यातील RMC उद्योग दिनांक ०९ मे २०२६ पासून सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे, जिल्हाधिकारी, PMC आयुक्त, वाहतूक पोलीस व MPCB यांनी दिलेल्या नियम व मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन करू.

 

नागरिक हेल्पलाइन उपक्रम

 

सुरक्षा, पर्यावरण संरक्षण व जबाबदार उद्योग पद्धती यासाठी पुणे आरएमसी असोसिएशनतर्फे टोल-फ्री हेल्पलाइन उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

 

जर कोणत्याही नागरिकांना खालील बाबी आढळल्यासः

 

ट्रान्झिट मिक्सरद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन

 

बेफिकीर / धोकादायक वाहन चालवणे

 

आरएमसी वाहन किंवा प्लांटमुळे होणारे प्रदूषण

 

कोणत्याही आरएमसी प्रकल्पामुळे नागरिकांना होणारा त्रास

 

तर कृपया तत्काळ टोल-फ्री क्रमांकावर (लवकरच जाहीर करण्यात येईल) संपर्क साधावा.

सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.

 

शाश्वत विकासासाठी वचनबद्धता

 

पुणे आरएमसी असोसिएशन खालील बाबींप्रती कटिबद्ध आहे:

 

शाश्वत विकास

 

पर्यावरण संरक्षण

 

पायाभूत सुविधा विकास

 

जगभरात पाण्यानंतर काँक्रीट हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ असून तो अत्यावश्यक व लवकर खराब होणारा (perishable) आहे. त्यामुळे RMC उद्योग हा समस्या नसून शाश्वत बांधकाम क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे Wahetas

 

RMC ASSOC PUNE * ON

 

श्री. प्रदीप पोपटराव वाल्हेकर

 

अध्यक्ष, पुणे आरएमसी असोसिएशन

.

 

“आम्ही समस्या नाही, आम्ही उपायाचा भाग आहोत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments