पुणे,8 जून 2026 : मॅरिएट इंटरनॅशनलने दक्षिण आशियामध्ये तीन हॉटेल्स सुरू करण्यासाठी सीजी हॉस्पिटॅलिटी ग्लोबल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारामुळे नेपाळ आणि भारतातील प्रमुख शहरी,आर्थिक आणि पर्यटन स्थळांवर मॅरिएटचे लक्झरी आणि प्रिमियम हॉटेल ब्रँडस सादर केले जातील. 2031 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा असलेली आणि कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 450 खोल्यांची भर घालणारी द रिर्टझ – कार्लटन काठमांडू, द वेस्टीन काठमांडू आणि मॅरिएट हॉटेल सिलिगुडी ही हॉटेल्स प्रवासी आणि रहिवाश्यांसाठी सेवा देण्यास सज्ज असतील


