पुणे, दि. ८: विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीत पुणे जिल्ह्यातील ३ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.
यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, डॉ. स्वाती देशमुख, समितीचे सदस्य सचिव तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीत अर्जदारांना तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व अर्जदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊन श्रीमती तेली उगले यांनी सुनावणी घेतली.
0000


